मुरबाडमध्ये म्हसोबाची यात्रा सुरू

मुरलीधर दळवी
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

मुरबाड (ठाणे) : शेकडो वर्षाची परंपरा असलेली म्हसोबाची यात्रा 2 जानेवारी पासून मुरबाड तालुक्यातील म्हसा गावी सुरू आहे. या यात्रे साठी ठाणे रायगड पालघर नाशिक नगर पुणे सोलापूर तसेच कर्नाटक मधून लोक येतात. विस्तीर्ण माळावर पसरलेला गुरांचा बाजार तसेच शेती व गुरांसाठी लागणारे साहित्य या साठी ही यात्रा प्रसिद्ध आहे. रविवार ता 7 जानेवारी पर्यंत यात्रा चालणार आहे.

मुरबाड (ठाणे) : शेकडो वर्षाची परंपरा असलेली म्हसोबाची यात्रा 2 जानेवारी पासून मुरबाड तालुक्यातील म्हसा गावी सुरू आहे. या यात्रे साठी ठाणे रायगड पालघर नाशिक नगर पुणे सोलापूर तसेच कर्नाटक मधून लोक येतात. विस्तीर्ण माळावर पसरलेला गुरांचा बाजार तसेच शेती व गुरांसाठी लागणारे साहित्य या साठी ही यात्रा प्रसिद्ध आहे. रविवार ता 7 जानेवारी पर्यंत यात्रा चालणार आहे.
 या पूर्वी वाहतुकीचे साधन नसल्याने लोक बैलगाडी व पायी येत असत. आता कल्याण, मुरबाड, नेरळ, कर्जत अशा ठिकाणावरून एसटी बस सोडण्यात येत असल्याने तसेच खासगी गाड्यांची संख्या मोठी असल्याने येथे सर्व प्रकारच्या वाहनांचीही जत्रा भरलेली असते.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी सुद्धा यंत्राच्या सहाय्याने शेती करण्यास सुरुवात केली असल्याने गुरांचा वापर एकदम कमी झाला आहे तरी सुद्धा हजारो गुरे या यात्रेत विक्रीसाठी आली होती. म्हसा यात्रेत हातोली जांभूळ खाजा ही मिठाई अत्यंत प्रसिद्ध आहे त्याच बरोबर घोगडी, ब्लॅंकेट, चादरी, भांडी, खेळणी, शेतीसाठी लागणारी पंजा विळे, कोयते, कुऱ्हाड या वस्तू सुद्धा मोठया प्रमाणात विक्रीला आहेत. आगरी कोळी कुणबी जातीचे लोक या बाजारातून बांबूच्या टोपल्या, सुपे, बांबूच्या काठया मोठया प्रमाणात खरेदी करतात.

म्हसा यात्रेत शंकराचे देऊळ हे केंद्रस्थानी असते या देवाला म्हसोबा असे नाव आहे. हे नाव शंकराच्या महेश्वर या नावाचा अपभ्रंश आहे म्हसोबाचे लिंग फार वर्षापूर्वी एका लाकडी खांबातून मिळाल्याने या देवाला खांब लिंगेश्वर असेही म्हटले जाते.

यात्रेचा पहिला दिवस हा शंकराची पूजा करून त्याला नवस बोलण्याचा प्रघात आहे दुसऱ्या दिवशी ज्यांनी मागील वर्षी नवस बोललेला आहे. त्यांचा नवस पूर्ण झाल्यास त्यांच्या पाठीच्या मणक्याला लोखंडी हुक टोचून नवस फेडण्याची पद्धत आहे. याला गळ लावणे असे म्हणतात. हा सोहळा शंकर मंदिराच्या बाजूलाचा असलेल्या नागमातेचा चौथऱ्या जवळ होतो. काही लोक केळी मिठाई यांची तुला करून किंवा नारळाचे तोरण बांधून नवस फेडतात. पूर्वी या यात्रेत कोंबडे बकरे यांचा बळी दिला जात असे ती प्रथा मात्र कमी झाली आहे. परंतु येथे मोठ्या प्रमाणात मांसाहार केला जातो. यात्रेकरूंच्या मनोरंजना साठी येथे आकाश पाळणे, जादूचे खेळ, मोतका कुवा अशी मनोरंजनाची साधनेही उपलब्ध आहेत या वर्षी यात्रेला गर्दी कमी असली तरी भाविकांचा उत्साह मात्र प्रचंड आहे यात्रा पूर्वी पंधरा दिवस चालत असे. परंतु आता जेमतेम संत दिवस यात्रा चालेल शनिवारी व रविवारी यात्रेला मोठी गर्दी होईल अशी अपेक्षा आहे.

 

Web Title: Marathi news thane news mhasoba yatra