ठाणे - मुरबाड येथील प्लास्टिक बॅगच्या कारखान्याला आग

मुरलीधर दळवी
गुरुवार, 15 मार्च 2018

मुरबाड (ठाणे) : मुरबाड आद्योगिक वसाहती मधील प्लास्टिक बॅग तयार करणाऱ्या कारखान्याला बुधवारी रात्री आग लागून पूर्ण कारखाना जळून खाक झाला. आगीच्या 7 आग्निशामक दलाला ही आग आटोक्यात आणण्यासाठी 6 तास लागले. सुमारे 70 लाख रुपयांची हानी झाल्याचा अंदाज आहे. आगीचे कारण अजूनही कळले नाही.

मुरबाड ठाणे आद्योगिक वसाहती मधील प्लास्टिक बॅग तयार करणाऱ्या ओम पॅकेजिंग या कारखान्याला बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आग लागून पूर्ण कारखाना जळून खाक झाला.

आग लागल्याचे समजताच मुरबाड शहरातील नागरिक व तीन खाजगी टँकर आग विझवण्यासाठी धावून गेले. मुरबाड आद्योगिक वसाहती मधील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, पण आगीचे स्वरूप मोठे असल्याने तहसीलदार सचिन चौधर यांनी कल्याण, अंबरनाथ, कुलगाव बदलापूर, भिवंडी येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. आगीच्या 7 बंबाना ही आग आटोक्यात आणण्यासाठी 6 तास लागले. 

या आगीत पेपर व प्लास्टिक बॅग तयार माल किंमत रुपये 50 लाख व कच्चा माल असा सुमारे 70 लाख रुपयांची हानी झाल्याचा अंदाज आहे आगीचे कारण अजूनही कळले नाही मुरबाडचे तहसीलदार सचिन चौधर, नायब तहसीलदार हनुमंत जगताप, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र मोरे, पोलीस निरीक्षक अजय वसावे यांनी घटना स्थळी भेट दिली.

Web Title: Marathi news thane news murbad fire at plastic bags factory