सिद्धगडावर पुन्हा एकदा पेटणार क्रांतीच्या मशाली

मुरलीधर दळवी
सोमवार, 1 जानेवारी 2018

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात शाहिद झालेले आझाद दस्त्याचे संस्थापक वीर भाई कोतवाल व त्यांचे सहकारी वीर हुतात्मा हिराजी पाटील यांच्या अमृत महोस्तवि बलिदान दीना निमित्त सिद्धगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मुरबाड : तालुक्यातील सिद्धगडाच्या घनदाट जंगलात भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आझाद दस्त्याचे संस्थापक वीर हुतात्मा भाई कोतवाल व हिराजी पाटील यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या स्मृती जगविण्यासाठी दरवर्षी 2 जानेवारीला सिद्धगड स्मारक समिती तर्फे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.   

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात शाहिद झालेले आझाद दस्त्याचे संस्थापक वीर भाई कोतवाल व त्यांचे सहकारी वीर हुतात्मा हिराजी पाटील यांच्या अमृत महोस्तवि बलिदान दीना निमित्त सिद्धगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

2 जानेवारी 1943 रोजी ब्रिटिश पोलीस अधीक्षक हॉल याने मुरबाड तालुक्यात सिद्धगडाच्या घनदाट जंगलात सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी गोळीबार करून ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या भाई कोतवाल व हिराजी पाटील यांना ठार मारले होते.
त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ सिद्धगड स्मारक समिती मुरबाड तर्फे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या देशभक्तांच्या कार्यावर आधारित वकृत्व स्पर्धा, समूह गीत स्पर्धा, दिगदर्शक एकनाथ देसले यांचे सिद्धगडाच्या रणसंग्रामावर आधारित नाटक असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती सिद्धगड स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार गोटीराम पवार यांनी दिली.

हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, माजी आमदार दिगंबर विशे, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांचे साठी ठाणे व रायगड जिल्ह्यातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तसेच विविध ठिकाणचे तरुण तरुणी क्रांती ज्योती घेऊन येणार आहेत.

Web Title: Marathi news Thane news siddhagad