दोन मुलींसह महिलेने विहिरीत उडी मारून केली आत्महत्या

नंदकिशोर मलबारी
गुरुवार, 11 जानेवारी 2018

सरळगाव : मुरबाड तालुक्यातील विढे या गावातील एका महिलेने आपल्या दोन मुलींसह एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार घडल्याचा गुन्हा मुरबाड पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. ही घटना समजताच तालुक्यात खळबळ माजली. नवरा व सासू यांच्या त्रासाला कंटाळून ही  आत्महत्या केली असल्याचा आरोप मयताच्या भावाने केला आहे.            

विढा गावचे पोलीस पाटील धनाजी शांताराम चौधरी यांनी या घटनेची खबर मुरबाड पोलीस ठाण्यात दिली. या खबरी वरून तातडीने पोलीस निरीक्षक अजय वसावे आपल्या पोलीसफाट्यास घटनेच्या ठिकाणी हजर झाले. या बद्दल मिळालेली माहीती असी की विढे गावातील वैशाली उल्हास चौधरी (वय 32) ही महिला आपल्या दोन मुलींना घेऊन सकाळपासून बेपत्ता असल्याने त्यांची शोधाशोध सूरू होती. या शोधाशोधीत एका लहान मुलीचा मृतदेह विहीरीत तरंगताना दिसला. याच ठिकाणी विहिरीच्या बाहेर एक महिलेचे चप्पल व चूंबळ पडल्याचे दिसून आले. या विहीरीत शोध घेतला असता वैशाली उल्हास  चौधरी (32), मुलगी आर्या (10) व जानवी (9) हीचा मृतदेह आढळून आला. काल रात्री आठच्या दरम्यान ही घटना उघड झाली. आई व तीच्या दोन मुलींना शवविच्छेदनासाठी मुरबाड ग्रामीण रूग्णालयात आणले होते. या घटनेची फिर्याद मयत महिलेचा भाऊ वैभव दत्तात्रय पडवळ (रा. मूळेगाव ता. शहापुर) यांनी मुरबाड पोलीस ठाण्यात दिली. या वेळी माझ्या बहिणीला नवरा व सासू हे त्रास देत असल्याचा आरोप फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे. आई व दोन मुली आत्महत्या ही घटना तालुक्यात प्रथमच घडल्याने हळहळ व संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अजय वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली सूरू आहे.       

Web Title: Marathi news thane news suicide mother and two daughters

टॅग्स