खासगी शिक्षकांचा ठाण्यात निषेध मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

ठाणे - महाराष्ट्र राज्य सरकारच्या शैक्षणिक विभागाने खासगी कोचिंग क्‍लासेसवर नियंत्रण आणण्यासाठी कच्चा मसुदा तयार केला आहे, याच्या निषेधार्थ खासगी शिक्षकांनी हजारोंच्या संख्येने मंगळवारी (ता. २७) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

खासगी शिक्षक संघटनांनी या विषयावर शैक्षणिक विभागाला वारंवार पत्रव्यवहार करूनही सरकारने कोणत्याही प्रकारे दाद दिली नाही. याचा निषेध करण्यासाठी आज ठाण्यात पालक, क्‍लासचे संचालक बहुसंख्य आजी-माजी विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यामध्ये घरगुती शिकवणी घेणाऱ्या महिला शिक्षकांचा मोठा समावेश होता. या मोर्चामध्ये मोर्चेकरांनी काळ्या रंगाच्या टोप्या, काळे झेंडे, निषेध फलक दाखवून निषेध व्यक्त केला. मोर्चा अत्यंत शांतीप्रिय, शिस्तीत व स्वच्छतेचे भान ठेवून निघाला. या मोर्चाचे नेतृत्व कोचिंग क्‍लासेस संघटनेने केले. संघटनेचे अध्यक्ष सतीश देशमुख, कार्याध्यक्ष विनायक चव्हाण, उप कार्याध्यक्ष रवींद्र प्रजापती आदी या मोर्चात सहभागी झाले होते.

Web Title: marathi news thane teacher rally