महिला विनयभंगप्रकरणी दोन परकी नागरिकांना अटक 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 6 मार्च 2018

मुंबई - महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी दोन परदेशी नागरिकांना अटक केली. एड्रिक डिव्यागो व फिलिपिक रॉड्रिक्‍स अशी दोघांची नावे असून ते झेक रिपब्लिकचे नागरिक आहेत. ते दोघे काही महिन्यांपूर्वी टुरिस्ट व्हिसावर भारतात आले होते. न्यायालयाने या दोघांची जामिनावर सुटका केली आहे. 

तक्रारदार महिला या अभिनेत्री आहेत. रविवारी त्या एका मैत्रिणीसोबत जुहूतील एका तारांकित हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्या होत्या. त्यांच्याकडे एकटक बघत राहिल्यामुळे तक्रारदार महिलेने त्या दोघांना जाब विचारला. तेव्हा त्यापैकी एक जण महिलेच्या मैत्रिणीसमोर गुडघे टेकून बसला. त्याबद्दल महिला त्याच्यावर ओरडली. अखेर त्या दोघी दुसरीकडे जाऊन बसल्या. घाबरून तक्रारदार महिलेने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. हॉटेलमधील सुरक्षारक्षकांनी एड्रिक व फिलिपिकला बाहेर नेले; परंतु काही वेळाने त्या दोघांनी पुन्हा आत येऊन महिलेजवळ येऊन अश्‍लील हावभाव केले आणि मग ते निघून गेले. महिलेने घडल्या प्रकाराची माहिती सांताक्रूझ पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या दोघांना चौकशीकरिता पोलिस ठाण्यात आणले होते. 

Web Title: marathi news Two foreigners arrested mumbai