उल्हासनगरात दोन पोलिसांवर हल्ला; 7 आरोपींना बेड्या

arrested
arrested

उल्हासनगर- नातलगांनीच एकाला मारहाण केल्याने त्यांना पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर 7 जणांनी काठ्या लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना काल रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास उल्हासनगरात घडली आहे. त्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जखमी झाला असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी खुनाचा प्रयत्न करणे,सरकारी कामात अडथळा आणणे आदी कलमा अंतर्गत 7 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

धोबीघाट परिसरात राहणारे बेनी प्रसाद यादव याला त्याच्याच नातलगांनी मारहाण केली होती. तशी तक्रार केल्यावर उल्हासनगर ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भारत दराडे, कॉन्स्टेबल वासुदेव डोळे हे आरोपींना पकडण्यासाठी गेले असता त्यांनी दराडे, डोळे यांच्यावरच लोखंडी रॉड, दांडक्यांनी हल्ला चढवला. त्यात डोळे हे किरकोळ तर दराडे यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना कल्याण मधील फोरटीज या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .याप्रकरणी पोलीस नाईक बाबासाहेब आव्हाड यांनी फिर्याद दाखल केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पालवे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेश आहेर यांच्या सोबत गुन्हे प्रकटीकरण पथकांच्या पोलिसांनी मिळून जितेंद्र यादव,रामचंद्र यादव, पिंटू यादव, वीरेंद्र यादव,सीतारा यादव, भागीरथ यादव, गणेश यादव यांना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक(गुन्हे)सुरेश आहेर करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com