उल्हासनगर स्वच्छ ठेवण्याचे महापौरांचे नागरिकांना आवाहन

दिनेश गोगी
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

उल्हासनगर : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत उल्हासनगरला हागणदारी मुक्ततेचे प्रमाणपत्र मिळाले आहे. ही जमेची बाजू असून त्या अनुषंगाने संपूर्ण शहराला कचरामुक्त करण्यासाठी पालिका प्रशासनाने धर्मगुरू रिंकू भाई साहेब आणि काली साई यांना स्वच्छता दूत म्हणून नेमले असून शहरात नागरिकांनी अस्वच्छता पसरविल्यास हा त्यांचा अपमान असल्यामुळे स्वच्छ उल्हासनगर बनविण्यासाठी हातभार लावण्याचे भावनिक आवाहन महापौर मीना आयलानी यांनी कचरामुक्तीसाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.

उल्हासनगर महापालिका प्रशासनाने कचरामुक्ती जनजागृती सभेचे आयोजन गुरुवारी सायंकाळी टाऊन हॉल येथे केले होते. या कार्यक्रमात स्वच्छतादूत म्हणून नियुक्त केलेले रिंकुभाई साहेब आणि काली साई याना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नगरसेविका मीना सोंडे, समाजसेविका ज्योती तायडे, कचरा संपविण्याच्या कामात अग्रेसर जयंत जोशी यांनी उपस्थितांना त्यांनी उभारलेल्या उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर स्वच्छता दूत काली साई यांनी भगवत गीतेचा आधार घेत ज्यांच्या घरी स्वच्छता असते, तिथेच देव वास करतात, असे सांगत भक्तगणांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. रिंकू भाई साहेब यांनीही स्वच्छता हेच आरोग्य असल्याने या कामात सर्व भक्तगणांनी सामील होण्याचे आवाहन केले.

यानंतर पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी उल्हासनगर हे जागृत नागरिकांचे शहर आहे, पण कचऱ्या विषयी जागृकतेची कमी असल्याकडे लक्ष वेधले. ही जागरूकता आणण्यासाठी धार्मिक गुरूंना स्वच्छता दूत नियुक्त केल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित भक्तगणांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.

Web Title: Marathi news ulhasnagar news clean ulhasnagar mayor appeal