उल्हासनगरात प्रभाग 17(ब)मध्ये पोटनिवडणुक जाहीर

दिनेश गोगी
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

उल्हासनगर : दिग्गज उमेदवार असणाऱ्या माजी उपमहापौर जया साधवानी यांचा पराभव करून प्रभाग 17(ब)मधून निवडून आलेल्या शिक्षिका पुजाकौर लभाना यांचे नगरसेवक पद जातप्रमाणपत्रामुळे रद्द झाले आहे. त्यामुळे या प्रभागात राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुक जाहिर झाली आहे. त्यासाठी मतदार याद्यांची प्रक्रिया हाताळण्याच्या सूचना उल्हासनगर महानगरपालिकेला देण्यात आल्याची माहिती आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिली.

17 फेब्रुवारी ला प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करणे, 26 फेब्रुवारीपर्यंत हरकती, 27 फेब्रुवारीला मतदार यादी प्रसिद्ध, 8 मार्चला प्रभागनिहाय व केंद्र निहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करणे. अशी प्रक्रिया हाताळण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने अवर सचिव नि.ज.वागळे यांनी पालिकेला दिल्या आहेत.

फेब्रुवारी 2017 मध्ये पार पडलेल्या पालिका निवडणुकीत शिक्षिका असलेल्या पुजाकौर लभाना यांनी काँग्रेसच्या माजी उपमहापौर जया साधवानी यांचा पराभव केला होता. पुजाकौर यांचे ओबीसी जातप्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार साधवानी यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे केली होती. त्यात तथ्य असल्याचे प्रमाण मिळाल्यावर पुजाकौर यांचे पद समितीने रद्द केले आहे. याबाबत राष्ट्रवादीचे गटनेते भारत गंगोत्री यांच्याशी विचारणा केली असता, आमच्याकडे ओबीसीचे किमान पाच महिला उमेदवार असून सक्षम उमेदवाराला उभे करून पुन्हा राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असे सांगितले.

Web Title: Marathi news ulhasnagar news by election in ulhasnagar 17 b ward