उल्हासनगरात कब्रस्तानसाठी काँग्रेसचे उपोषण

दिनेश गोगी
सोमवार, 12 मार्च 2018

उल्हासनगर : राज्यशासनाने उल्हासनगरात कब्रस्तानसाठी दोन भूखंड आरक्षित केले आहेत. या भूखंडांना मुस्लिमांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणी करिता आज काँग्रेसने पालिकेसमोर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात भिवंडी मधील काँग्रेस नेते नगरसेवक सहभागी झाले आहेत.

उल्हासनगर : राज्यशासनाने उल्हासनगरात कब्रस्तानसाठी दोन भूखंड आरक्षित केले आहेत. या भूखंडांना मुस्लिमांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणी करिता आज काँग्रेसने पालिकेसमोर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात भिवंडी मधील काँग्रेस नेते नगरसेवक सहभागी झाले आहेत.

गेल्या 40 वर्षांपासून मुस्लिम नेते कब्रस्तानसाठी लढा देत आहेत. राज्यशासनाने म्हारळ गावाशेजरील सर्व्हे नंबर 58 या भूखंडा सोबत कैलास कॉलनी भागातही कब्रस्तानची जागा दिलेली आहे. मात्र अद्यापही हे भूखंड तांत्रिक बाब पुढे करून मुस्लिमांच्या ताब्यात देण्यात आले नसल्याने अंबरनाथमध्ये जनाजे न्यावे लागत होते. आता अंबरनाथला मुस्लिमांची वाढती लोकसंख्या गृहीत धरून कब्रस्तानची जागा अपुरी पडत असल्याने मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष सलीमभाई चौधरी यांनी उल्हासनगरातील जनाजांना अंबरनाथमध्ये मनाई केली आहे. तसे पत्र त्यांनी महापौर मिना आयलानी, आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना दिले आहे. तरीही माणुसकी म्हणून काही दिवसांपूर्वी 18 दिवस घरात पडून राहिलेला एका मुस्लिम महिलेचा जनाजा सलीमभाई चौधरी यांनी पालिका आणि पोलिसांच्या विनंती नुसार दफन करू देण्याची परवानगी दिली होती.

मुस्लिमांची अशी अवस्था झाली असतानाही पालिका कब्रस्तानच्या मुद्याला गांभीर्याने घेत नसल्याने उल्हासनगर काँग्रेसचे सचिव अमर जोशी यांनी पालिकेसमोर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात भिवंडी काँग्रेसचे अध्यक्ष शोएब गुड्डू, भिवंडी मनपाचे सभागृहनेते प्रशांत लाड, काँग्रेस गटनेते हलीम अन्सारी, नगरसेवक अबू सुफियान शेख, अरुण राऊत, मुन्नाभाई, स्वाभिमान संघटनेचे रोहित साळवे, युथ काँग्रेसचे फजल खान, मन्नान खान, अब्दुल शेख आदी सहभागी झाले होते.

दरम्यान मालमत्ता विभागाचे भगवान कुमावत, विशाखा सावंत, मुख्य सुरक्षा अधिकारी बाळू नेटके यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेतली. कब्रस्तानचा ठराव दाखवला. मात्र ठराव नको तर अंमलबजावणी हवी, आयुक्तांशीच बोलणी करणार. असा पवित्रा उपोषण कर्त्यांनी घेतला आणि अधिकाऱ्यांना परत पाठवले.

Web Title: Marathi news ulhasnagar news hunger for graveyard of muslims