उल्हासनगर - शिवसेना विभाग प्रमुख नाना म्हसाळ यांचा अपघाती मृत्यू

दिनेश गोगी
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

उल्हासनगर : आज शनिवारी अहमदनगर मध्ये शिवसैनिकाच्या मुलाच्या लग्नाला जात असतानाच काल रात्री मालवाहू टेम्पोने धडक दिल्याने उल्हासनगरातील शिवसेना विभाग प्रमुख नाना म्हसाळ यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. ते 55 वर्षांचे होते. या अपघातात चार जण किरकोळ जखमी झाले असून अधिक मार लागल्याने काही दिवसांपूर्वीच पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झालेले शेख हे मृत्यूच्या उंबरठ्यावर असून त्यांच्यावर युद्धपातळीवर उपचार केले जात आहेत.

शिवसैनिक राम कदम यांच्या मुलाचे लग्न असल्याने विभागप्रमुख नाना म्हसाळ, रिपाइं आठवले गटाचे माजी नगरसेवक जे. के. ढोके, सेवानिवृत्त पोलीस शेख आदी सात जण नानाच्या जीपने अहमदनगर कडे जात असतानाच मालवाहू टेम्पोने जीपला धडक दिल्याने जीप चालवणारे नाना त्यांच्या बाजूला बसलेले शेख गंभीर जखमी झाले. अहमदनगरचे शिवसेना नगरसेवक अशोक दहिफळे यांना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. नाना यांना रुग्णालयात दाखल केले पण त्यांचा मृत्यू झाला.

सतत आंदोलनात सहभागी होणारे नाना म्हसाळ यांच्या मृत्यूने उल्हासनगरात हळहळ व्यक्त होत आहे.म्हसाळ यांच्यावर अचानक काळाने झडप घातल्याने आज शिवजयंती निमित्ताने आयोजित करण्यात आलेली शिवसैनिकांची मीटिंग रद्द करण्यात आल्याची माहिती शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली.

Web Title: Marathi news ulhasnagar news shivsena leader dies in accident