उल्हासनगरातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची अनपेक्षित खेळी

दिनेश गोगी
गुरुवार, 15 मार्च 2018

उल्हासनगर : पुजाकौर लभाना यांचे जातप्रमाणपत्रामुळे नगरसेवकपद रद्द झाल्याने प्रभाग 17 मध्ये 6 एप्रिलला पोटनिवडणूक होत आहे. विशेष म्हणजे पुजाकौर यांची तक्रार ज्यांनी केली होती, त्या काँग्रेसच्या पराभूत उमेदवार माजी उपमहापौर जया साधवानी यांच्या चुलत बहिणीला उमेदवारी जाहिर करून राष्ट्रवादीने अनपेक्षित खेळी खेळली आहे. ते पाहता दोन चुलत बहिणीत काट्याच्या लढाईचे संकेत मिळू लागले आहेत.

शिक्षिका असलेल्या पुजाकौर यांनी 2017 सालच्या उल्हासनगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कडून निवडणूक लढवताना काँग्रेसच्या दिग्गज उमेदवार तथा माजी उपमहापौर जया साधवानी यांचा पराभव केला होता. मात्र पुजाकौर यांचे ओबीसी जातप्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार साधवानी यांनी जात पडताळणी समितीकडे केल्यावर आणि त्यात तथ्य आढळल्यावर समितीने पुजाकौर यांचे नगरसेवक रद्द केले आहे. त्यानुसार पुढील महिन्याच्या 6 एप्रिलला प्रभाग 17 मध्ये पोटनिवडणूक लागलेली आहे.

या निवडणुकीसाठी भाजपा, काँग्रेसने अद्यापही उमेदवारी जाहीर केली नसताना राष्ट्रवादीने जया साधवानी यांची चुलत बहीण सुमन राजेश सचदेव यांची राष्ट्रवादी उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव तसेच जिल्हा निरीक्षक सुधाकर वड्डे,पालिकेतील गटनेते भारत गंगोत्री यांनी सुमन सचदेव यांच्या नावाची घोषणा आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी उपाध्यक्ष भीमसेन मोरे, राष्ट्रवादीचे माजी युवक अध्यक्ष तथा वणवा समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष निलेश पवार, विशाल माखिजा, माधव बगाडे, नगरसेविका सुनिता बगाडे, माजी नगरसेविका पुजाकौर लभाना आदी उपस्थित होते.
 
Web Title: Marathi news ulhasnagar news ulhasnagar6 by poll rashtravadi