पाच वर्षे सुविधा देणाऱ्या उमेदवारांनाच मतदान करणार..

दिनेश गोगी
गुरुवार, 25 जानेवारी 2018

उल्हासनगर : निवडून आल्यावर मतदारांकडे पाठ फिरवणाऱ्या उमेदवारांना नाही तर पाच वर्षे सुविधा देताना मतदारांच्या संपर्कात राहणाऱ्या उमेदवारांनाच मतदान करणार, असा संकल्प आज राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्ताने मतदारांनी केला. त्यांना मतदार नोंदणीचे प्रमाणपत्र देण्यात आले.

उल्हासनगरातील प्रभाग समिती तीन मध्ये पंधरा ते वीस नागरिकांनी नव्याने मतदार नोंदणी केली. तेव्हा पाच वर्षात खासदार, आमदार आणि नगरसेवक असे तीनदा मतदान करण्याची संधी मिळते. यापुढे पाच वर्षे नागरी सुविधा पुरवणाऱ्या उमेदवारांनाच मतदान करणार असा संकल्प त्यांनी बोलून दाखवला.

सहाय्यक आयुक्त प्रबोधन मवाडे यांनी नव्या मतदारांना शपथ दिली. यावेळी शिवसेना रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे कल्याण जिल्हा लोकसभा क्षेत्र अध्यक्ष रवी चव्हाण, वरिष्ठ लिपिक पि.ओ.पाटील, प्रभाग समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Marathi news ulhasnagar news voters day