प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला तरूणांनी गाव केले स्वच्छ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

वाडा : कुणाच्या हातात झाडू तर कुणाच्या हातात फावडे, कुणाच्या हातात कोयता तर कुणाच्या हातात घमेला घेऊन घोणसई गावातील तरूणांनी आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला तरूणांनी सामाजिक बांधिलकी जपत गावाची साफसफाई करून गाव चकाचक करून एक आदर्श निर्माण केला आहे. युवकांच्या या उपक्रमामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.

घोणसई हे वाडा तालुक्यातील एक टुमदार खेडेगाव. साधारणपणे एक हजाराच्या आसपास लोकसंख्या गावाची आहे. येथे जय बजरंग बळी युवा मित्र मंडळ कार्यरत असून पन्नासच्या आसपास सदस्य या मंडळाचे आहेत. या मंडळातील युवकांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला गावात स्वच्छता अभियान राबविण्याचा मानस व्यक्त केला आणि त्याला इतर सदस्यांनी होकार दिला. आज सकाळीच कुणा तरूणाच्या हातात झाडू तर कुणा तरूणांच्या हातात घमेला, कुणा तरूणाच्या हातात फावडा तर कुणाकडे कोयता घेऊन तरूणांनी गावात स्वच्छता अभियानाला सुरवात केली. 

बघता बघता संपूर्ण गाव स्वच्छ करण्यात आले. एवढेच नाही तर जिथे गावात पाणी साचते अशा ठिकाणी चुना मारण्यात आला. तर उगवलेली झाडे झुडपे तोडण्यात येऊन गाव चकाचक केले. शुक्रवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त गावात असलेल्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थी सकाळी प्रभातफेरी काढतात. या विद्यार्थ्यांना रस्त्यावर घाणीत प्रभात फेरी काढता येऊ नये म्हणून हा स्वच्छता उपक्रम राबविला अशी माहिती या मंडळाचे कार्यकर्ते सागर पाटील यांनी दिली. या मोहिमेत कल्पेश पाटील, संदीप पाटील, रोहित पाटील, मुकेश पाटील, हर्षद चौधरी आदींसह मोठय़ा संख्येने युवक सहभागी झाले होते. युवकांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. स्वच्छता अभियान मोहीमेच्या शुभारंभ प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अॅड. दिपक भोईर, ग्रामपंचायत सदस्य विकास घरत, अशोक घोरकणे, ग्रामस्थ नितीन चौधरी, भगवान भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Marathi news wada cleaning of village