वाड्याच्या उपनगराध्यक्षपदी उर्मिला पाटील 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

वाडा : वाडा नगरपंचायतीत उपनगराध्यक्षपदासाठी गुरूवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उर्मिला पाटील या बिनविरोध विजयी झाल्या. वाडा नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणुक 13 डिसेंबरला झाली होती. या निवडणुकीत प्रथमच नगराध्यक्ष पदाकरिता थेट जनतेतून निवड करण्याचा निर्णय झाला होता. निवडणूकीत शिवसेना व भाजप यांच्यात खऱ्या अर्थाने लढत होऊन भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निशा सवरा यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत शिवसेनेच्या गितांजली कोळेकर या विजयी झाल्या. मात्र शिवसेनेला नगराध्यक्ष पदात विजय मिळाला असला तरी नगरसेवक पदाच्या सतरा जागांपैकी अवघ्या सहा जागांवर समाधान मानावे लागले.

वाडा : वाडा नगरपंचायतीत उपनगराध्यक्षपदासाठी गुरूवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उर्मिला पाटील या बिनविरोध विजयी झाल्या. वाडा नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणुक 13 डिसेंबरला झाली होती. या निवडणुकीत प्रथमच नगराध्यक्ष पदाकरिता थेट जनतेतून निवड करण्याचा निर्णय झाला होता. निवडणूकीत शिवसेना व भाजप यांच्यात खऱ्या अर्थाने लढत होऊन भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निशा सवरा यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत शिवसेनेच्या गितांजली कोळेकर या विजयी झाल्या. मात्र शिवसेनेला नगराध्यक्ष पदात विजय मिळाला असला तरी नगरसेवक पदाच्या सतरा जागांपैकी अवघ्या सहा जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत नसल्याने उपनगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आणण्याचे शिवसेने पुढे आव्हान होते. नगरपंचायत निवडणूकीच्या निकालात शिवसेना सहा, भाजप सहा, काँग्रेस दोन तर राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं व बहुजन विकास आघाडी यांचे प्रत्येकी एक उमेदवार निवडून आले होते. 

आज झालेल्या निवडणुकीत उपनगराध्यक्ष पदाकरिता शिवसेनेकडून उर्मिला पाटील यांनी तर भाजप कडून गटनेते मनिष देहेरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र देहेरकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने उर्मिला पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूकीच्या पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष गितांजली कोळेकर यांनी केली. शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत नसल्याने शिवसेनेने काँग्रेसच्या दोन सदस्यांचा पाठिंबा सुरवातीलाच मिळवल्याने शिवसेनेचे संख्याबळ नगराध्यक्षा सह नऊ झाले होते. त्यात नगराध्यक्षांना कास्टिंग मत असल्याने शिवसेना आपला उपनगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आणेल एवढे संख्याबळ झाल्याने अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं व बहुजन विकास आघाडी या पक्षांनीही शिवसेनेला पाठिंबा देत सत्तेसोबत राहिले. त्यामुळे शिवसेनेचा विजयाचा मार्ग सुकर झाला. यावेळी शिवसेनेचे नेते राजेश शहा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे, उपजिल्हा प्रमुख अरूण पाटील, प्रदेश काँग्रेसचे सचिव मनीष गणोरे,  तालुका प्रमुख प्रकाश पाटील, ज्येष्ठनेते प्रा. धनंजय पष्टे, तुषार यादव, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रोहीदास पाटील, शहराध्यक्ष अमिन सेंदू आदी उपस्थित होते. 
 

Web Title: Marathi news wada elections