पोलीस अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

वाडा : वाडा तालुक्यातील चिंचघर येथील एका तरूणाने शाहुराज रणवारे या पोलीस अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून बुधवारी (ता. 10) सायंकाळी थायमेट हे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तरूणाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अंबाडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या तरूणाने सुसाईड नोट सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली असून पोलीसांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

वाडा : वाडा तालुक्यातील चिंचघर येथील एका तरूणाने शाहुराज रणवारे या पोलीस अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून बुधवारी (ता. 10) सायंकाळी थायमेट हे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तरूणाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अंबाडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या तरूणाने सुसाईड नोट सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली असून पोलीसांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

कृपाल दाजी पाटील (वय 28) असे त्या तरूणाचे नाव असून त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटनुसार, वाडा तालुक्यातील चिंचघर येथील कृपाल पाटील हा तरूण आपल्या विधवा आईसह राहून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्याचे गावानजीकच असलेल्या एका गावातील मुलीबरोबर प्रेमप्रकरण होते. असे असतानाच या मुलीचे आणखी एक दोन तरूणाचे प्रेमसंबंध होते. हे कृपाल याला समजल्यावर त्या दोघांमध्ये वाद झाला. त्याने तिला एक दोन फटके सुद्धा मारले. त्यानंतर थोडे दिवस ती मुलगी व्यवस्थित वागली. पुन्हा तेच प्रकार मुलीने सुरू केले. पुन्हा या दोघांत वाद झाला. या वादानंतर मुलीच्या घरच्यांनी  कुडूस पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणवारे यांना भेटून तोंडी तक्रार केली.  

रणवारे यांना भेटल्यानंतर ते कृपाल कडून 2 लाखांची मागणी करू लागले. व पैसे दिले नाहीत तर मुलीचे व त्याचे काढलेले फोटो व व्हिडिओ तुझ्याकडे आहेत असा खोटा गुन्हा दाखल करून जेलमध्ये पाठवू असा दम त्यांनी भरला. 22 डिसेंबर 2017 रोजी
जेलमध्ये पाठवू असा दम त्यांनी भरला. 22 डिसेंबर 2017 रोजी कूडूस पोलीस चौकीत कृपाल याला बोलावून मारहाण करून धमकावले व दोन लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर 23 ते 27 डिसेंबर या कालावधीत कृपाल याने सदर पोलीस अधिकाऱ्याला दोन टप्प्यात एक लाख रुपये एका कार्यकत्यामार्फत दिले. त्यानंतरही पोलीस अधिकारी रणवारे आणखी पैशाची मागणी वारंवार करून धमकावू लागल्याचे सुसाईट नोट मध्ये कृपाल याने नमूद केले आहे.                                                                                                                                                           
कृपाल याच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने आणखी पैसे द्यायचे कूठून असा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला. अखेर या जाचाला कंटाळून कृपाल याने बुधवारी सायंकाळी  थायमेट हे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अंबाडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरूणाने सुसाईट नोट लिहून ठेवून ती फेसबुकवर टाकून व्हायरल केल्याने ही घटना उघडकीस आली आहे. याबाबत वाडा पोलीस ठाण्यात अद्यापपर्यत कुठल्याही प्रकारची तक्रार अथवा गुन्हा दाखल केलेला नाही. मात्र सुसाईट नोट ची दखल घेऊन पालघरचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ शिंगे यांनी शाहूराज रणवारे यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. दरम्यान या घटनेसंदर्भात पोलीस अधीक्षक शिंगे यांच्या स्तरावरून उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली असल्याची माहिती वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र नाईक यांनी दिली.

Web Title: Marathi news wada suicide attempt by boy