आठ तास ड्यूटीचा महिला पोलिसांना फायदा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

मुंबई - पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी "आठ तास ड्यूटी' उपक्रमाला मुंबईत चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. शहरातील 82 पोलिस ठाण्यांत हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे. कामाची वेळ आठ तास केल्याचा चांगला फायदा महिला पोलिसांना होत आहे. 

उत्सव, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे आणि तपास कामामुळे पोलिसांना 12 तासांहून अधिक वेळ काम करावे लागते. काही पोलिस हे दूरवरून कर्तव्यासाठी येत असतात. कामाचा व्याप आणि तणावामुळे पोलिसांना जीवनशैलीशी निगडित आजाराची लागण होते. याची दखल घेत मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम देवनार पोलिस ठाण्यात राबवला.

Web Title: marathi news women police mumbai