गव्हर्मेंट कॉलनीतला मराठी माणूस सुरक्षित  - राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

मुंबई - वांद्य्राच्या गव्हर्मेंट कॉलनीत राहणारा मराठी माणूस आणि त्यांच्या पुढील पिढ्या येथेच आयुष्य घालवतील, असा दिलासा देतानाच सरकारध्ये हिंमत असेल तर या रहिवाशांना येथून काढण्याचा फक्त प्रयत्नच करावा, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी (ता. 1) राज्य सरकारला दिला. 

या सरकारी वसाहतीतील रहिवाशांना येथेच घरे मिळावीत, या मागणीसाठी तेथील रहिवासी महिलांनी नुकतीच ठाकरे यांची भेट घेतली होती. त्या पार्श्‍वभूमीवर ठाकरे यांनी या परिसरात सभा घेतली. परप्रांतीयांसाठी मुंबईतील मराठी माणसांना बेघर करण्याचे कारस्थान सुरू आहे. गुजरातला मुंबई जोडण्यासाठी अनावश्‍यक बुलेट ट्रेन प्रकल्पाचा घाट घातला जात आहे. मुंबईत परप्रांतीयांच्या झोपड्या वसवण्याचे काम अमराठी आणि मराठी बिल्डर करीत आहेत; मात्र सरकारने पुनर्वसन प्रकल्प बिल्डरांना न देता ते स्वतःच राबवून नफा मिळवावा, असेही ठाकरे यांनी सांगितले. 

या वसाहतीतील रहिवाशांना घरे येथेच मिळतील. तुम्ही निश्‍चिंत रहा. तुम्हाला कोणीही धक्का लावणार नाही. तुम्ही विचलित होऊ नका, या शब्दांत ठाकरे यांनी रहिवाशांना धीर दिला. फक्त एकदा महाराष्ट्राची सत्ता माझ्या हाती सोपवा, पुन्हा कोणीही रडत मागण्या घेऊन माझ्याकडे येणार नाही, असेही ते या वेळी म्हणाले. 

Web Title: Marathi people safe in the government colony - Raj Thackeray