पाली-खोपोली महामार्गावर मराठीची गळचेपी

पाली-खोपोली मार्गावरील इंग्रजी भाषेतील सूचना फलक.
पाली-खोपोली मार्गावरील इंग्रजी भाषेतील सूचना फलक.

मुंबई : पाली-खोपोली राज्य महामार्ग 548 (अ) या मार्गावर लावण्यात आलेले सूचना फलक मराठी भाषेतून नसून चक्क इंग्रजी आणि हिंदी भाषेतील आहेत. त्यामुळे एमएसआरडीसी व रस्ते बनविणाऱ्या कंत्राटदारास मराठीचे वावडे आहे की काय? असा प्रश्‍न वाहनचालकांकडून विचारला जात आहे. 

पाली-खोपोली राज्य महामार्ग 548 (अ) रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावरून प्रवास करणारे बहुतांश प्रवासी व वाहनचालक मराठी भाषिक तसेच परिसरातील ग्रामीण रहिवासी आहेत. त्यांना इंग्रजी आणि हिंदी भाषेतील सूचना लवकर लक्षात येत नाही. त्यामुळे त्यांची गैरसोय होते. इंग्रजी व हिंदीतील सूचना फलकवरील अनेक शब्द व वाक्‍यच कळत नसल्याने पुढे नक्की काय धोका किंवा परिस्थिती आहे हे वाहनचालकांना समजतच नाही.

ही बाब "सकाळ'ने चार दिवसांपूर्वी एमएसआरडीसी प्रशासनाच्या लक्षात आणून दिली आहे. त्यावर मराठीतून सूचना फलक लावले जातील असे सांगण्यात आले. या संदर्भात माहिती घेण्यासाठी गुरुवारी (ता. 1) बेग कन्स्ट्रक्‍शन कंपनीचे प्रोजेक्‍ट मॅनेजर सुजय पॉल यांना दूरध्वनी केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

मराठी भाषेतून सूचना फलक लावण्यासाठी कंत्राटदारास सांगितले आहे. त्यांनीदेखील मराठीतून सूचना फलक तयार करण्यास दिले आहेत. दोन-तीन दिवसांत या मार्गावर मराठीतून सूचना फलक लावले जातील. 
सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी 

मार्गावर मराठीतून सूचना फलक लावण्यात यावे, यासाठी आम्ही एमएसआरडीसीला निवेदन देणार आहोत. त्यांना मागणीची दखल घ्यावीच लागेल. मराठीतून फलक लावले जातीलच. अन्यथा आम्ही आंदोलन करू. 
सुनील साठे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सुधागड तालुका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com