अन्नदात्याच्या मरणयातनांसाठी 19 मार्चला करुया उपवास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

मुंबई : एक-दोन नव्हे तर तब्बल 31 वर्षे या राज्यातील शेतकरी आत्महत्या करतोय. शेतकरी आत्महत्येच्या नावावर राजकारण, समाजकारण केलं जातंय. जो कुणी विरोधी पक्षात असेल तो बळीराजाशी असलेली त्यांची तळमळ दाखविण्यासाठी सरकारच्या विरोधात गरळ ओकतोय; पण या शेतकरी आत्महत्यांचा साधा इतिहासही या राजकारण्यांना माहीत नाही, हे एक जळजळीत वास्तव आहे. 

मुंबई : एक-दोन नव्हे तर तब्बल 31 वर्षे या राज्यातील शेतकरी आत्महत्या करतोय. शेतकरी आत्महत्येच्या नावावर राजकारण, समाजकारण केलं जातंय. जो कुणी विरोधी पक्षात असेल तो बळीराजाशी असलेली त्यांची तळमळ दाखविण्यासाठी सरकारच्या विरोधात गरळ ओकतोय; पण या शेतकरी आत्महत्यांचा साधा इतिहासही या राजकारण्यांना माहीत नाही, हे एक जळजळीत वास्तव आहे. 

साहेबराव करपे नावाच्या चील गव्हाण गावातील शेतकऱ्याने 19 मार्च 1986 रोजी आपली पत्नी आणि चार मुलांसह जेवणात विष कालवून आत्महत्या केली होती. जगजाहीर झालेली ती या देशातील पहिली शेतकरी आत्महत्या. अमर हबीब आणि काही सामाजिक कार्यकर्ते याच दिवशी म्हणजे, येत्या 19 मार्च रोजी आपल्या अन्नदात्याच्या मरणयातनांसाठी उपवास करणार आहेत. 

गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या विधीमंडळ अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून रणकंदन सुरू आहे. विरोधी पक्षच नव्हे, तर सत्तेतील भागीदारही कर्जमुक्‍तीची भाषा करीत आहेत; मात्र राज्याच्या इतिहासात शेतकरी आत्महत्येची ही काळी रेष उमटवणारा तो काळा दिवस काहीसा विस्मरणात गेलाय. अनेक राजकारण्यांना तर या विषयाची साधी माहिती देखील नाही. तर काहींनी विषय अंगलट यायला नको म्हणून टाळलाय. 

राजकारण्यांनी याबाबत कातडीबचावू भूमिका घेतली असली, तरी आपण त्यांना विसरायला नको. त्या दिवसाची नुसती आठवण म्हणून नाही, तर आपल्यासाठी अन्न पिकवणाऱ्या, अन्नदात्याची जाणीव म्हणून या दिवशी एक दिवसाचा उपवास केला जाणार आहे. तुम्हीही या उपवास आंदोलनाचा एक भाग व्हावे ही अपेक्षा. त्यासाठी तुम्हा सर्वांना हे जाहीर आवाहन आहे. आजवर तुम्ही या ना त्या देवासाठी उपवास केला असेल; पण शेतकऱ्यांच्या वेदनांमध्ये सहभागी होण्यासाठी, त्याला दिलासा देण्यासाठी आणि सरकारपर्यंत शेतकऱ्यांची हाक पोहचविण्यासाठीचा हा एक प्रयत्न आहे. 
तुम्ही यात सहभागी होणार असाल तर तुमचं नाव, वय आणि व्यवसाय आम्हाला 8888809306 या व्हॉटस्‌ऍप क्रमांकावर पाठवा. 

कारण, विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रसारमाध्यमांतून शेतकऱ्यांप्रती आपली कळकळ व्यक्‍त करणारे नेतेही याबाबतीत किती असंवेदनशील आणि कोरडे आहेत, हे पुन्हा एकदा समोर आलंय. कारण, राजकीय नेत्यांना असलेली याबाबतची माहिती आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला. त्यातून काय हाती लागले ते आम्ही सविस्तर मांडतो आहोत...

Web Title: March 19 let the fasting for farmers