टोरंट कंपनी विरोधातील मोर्चात सर्वपक्षीय एकजुटीचे दर्शन

टोरंट कंपनी विरोधातील मोर्चात सर्वपक्षीय एकजुटीचे दर्शन

ठाणे : कळवा- मुंब्रा विद्युत खाजगीकरणाला उर्जामंत्री चंदशेखर बावनकुळे यांनी स्थगिती दिल्याचा दावा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतरही टोरंट कंपनीविरोधात आज (शनिवार) कळवा,खारीगांव, पारसिकनगर, मुंब्रा, दिवा, शिळ, देसाई गाव बंदची हाक दिली. तसेच, याविरोधात कळवा, पारसिकनगर ते ठाणे,जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या बंद व मोर्चामध्ये सर्वपक्षीयांच्या एकजुटीचे दर्शन घडले. या मोर्चाचे नेतृत्व सर्वपक्षीय समन्वय समितीचे अध्यक्ष, सेना उपनेते दशरथ पाटील यांनी केले.

वीज वितरण व वीज बिल वसुलीसाठी टोरंट या खाजगी कंपनीला राज्य शासनाने कंत्राट दिले आहे. 26 जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. या खाजगी कंपनीमुळे सर्वसामान्य ग्राहकाला वीजबिलाचा मोठा भुर्दंड बसणार असून, शासनाच्या महसुलात मोठ्या प्रमाणात तूट येणार आहे. भिवंडी शहरातील टोरंट या कंपनीच्या कारभारचा वाईट अनुभव असल्याने कळवा, खारीगांव, पारसिकनगर, मुंब्रा, दिवा, शिळ, दिवागांव, देसाई आणि परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिकांनी समन्वय समिती स्थापन करून आंदोलन छेडले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com