कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा वाशीत मोर्चा

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा वाशीत मोर्चा
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा वाशीत मोर्चा

नवी मुंबई : मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील गैरकारभाराची चौकशी करून प्रभारी उपसंचालकांना कोणत्याही प्रकारे बढती देऊ नये, यासह शिक्षकांच्या रखडलेल्या वेतनासंदर्भात बुधवारी (ता.11) दुपारी 2 वाजता मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी वाशी रेल्वेस्थानक ते एसएससी बोर्डावर पायी मोर्चा काढला होता. 

मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. द्विलक्षी आणि व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमातील शिक्षकांच्या बदलीस शिक्षण उपसंचालक कार्यालयातून नकार दिला जात आहे. विनाअनुदानित सेवा अनुदानासाठी ग्राह्य धरण्यास तसेच विनाअनुदानित संस्थांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना वेतनश्रेणी मान्यता देण्यास शिक्षण उपसंचालक कार्यालयातून टाळाटाळ केली जात आहे. यामुळे शिक्षकांचे प्रचंड नुकसान होत असल्याचा आरोप संघटनेचे सचिव प्रा. मुकुंद आंधळकर यांनी केला. याचबरोबर संचमान्यता नियमानुसार होत नाही, अर्धवेळ शिक्षकांचे वेतन रोखून ठेवण्यात आले आहे, उपप्राचार्य, पर्यवेक्षक पदांसाठी विनाअनुदानित तुकड्यांची संख्या ग्राह्य धरण्यात आलेली नाही. नव्याने शिक्षकांच्या नेमणूक मान्यतेचे प्रस्ताव स्वीकारण्यास टाळाटाळ, अर्धवेळ शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ दिला जात नाही. असे गाऱ्हाणे या वेळी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष कृष्णकांत पाटील यांच्यासमोर मांडण्यात आले. या वेळी महिला शिक्षकांचादेखील सहभाग मोठ्या संख्येने होता. या वेळी आठशे शिक्षकांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. शिक्षकाच्या शिष्टमंडळाने शिक्षण मंडळातील अध्यक्ष कृष्णकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. पाटील यांनी निवेदन स्वीकारून या मागण्या आयुक्तांकडे पाठवल्या जातील, असे आश्‍वासन दिले असल्याची माहिती आंधळकर यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com