नाताळसाठी बाजारपेठ सजली

नाताळसाठी बाजारपेठ सजली
नाताळसाठी बाजारपेठ सजली

नवी मुंबई : सर्वत्र नाताळाची तयारी सुरू झाली असून, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने हा सण साजरा करण्याचे नियोजन करण्यात गुंतला आहे. बाजारात सांताक्‍लॉज आणि चॉकलेटचे केक उपलब्ध झाले आहेत. तसेच ख्रिसमस ट्री, स्टार, बेल, मास्क, कपडे, टोप्या, आदी वस्तू बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. या वेळी दुकानदारांकडून सांताक्‍लॉजच्या माध्यमातून चिमुकल्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत सगळ्यांनाच नाताळचे आकर्षण असते. आंनदाने नाचून-गाऊन साजरा करण्याचा हा सण आहे. केक यातला महत्त्वाचा भाग असतो. चॉकलेट म्हटले की लहान मुलांची आठवण येते. त्याचबरोबर नाताळचे महत्त्व असणारा सांताक्‍लॉजचाही केकमध्ये समावेश झालेला आहे. या दिवसांत प्रत्येक ठिकाणी आपल्याला सांताक्‍लॉज दिसून येतो. विविध रंगांनी, डिझाईन केलेले केक बनवण्यात येतात. यात आपणास सांताची अनेक रूपे पाहायला मिळतात. काही केकविक्रेत्यांकडे नाताळासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. या वेळेला दुकानदारांनी सांतालाच बोलावले आहे. त्याच्याच हातून केकवाटप करण्यात येत असून, काही भेटवस्तूही दिल्या जात आहेत. सांताकडून चॉकलेट आणि केक मिळाल्यानंतर मुलांना आनंद होतो. हे लक्षात घेऊन विक्रेत्यांनी त्यांना आकर्षित करण्यासाठी ही नवी शक्कल शोधून काढली आहे. 

तसेच बाजारात सांताच्या टोप्या विक्रीसाठी दाखल झाल्या असून, घराच्या रोषणाईस विविध प्रकारच्या रंगीबेरंगी सजावटीच्या माळा, रोषणाई करणारे दिवे, मेरी ख्रिसमस स्टिकरही खरेदी केले जात आहेत. तसेच चॉकलेटच्या पदार्थांना टिकाऊपणामुळे मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे. दुकानांमध्ये विविध स्वादांच्या विविध रंगरूपांतील चॉकलेटने खरेदीदारांना भुरळ घातली आहे. विविध आकाराच्या खोक्‍यांमध्ये कागदी किंवा कापडी आवरणात बांधून हे चॉकलेट दिले जात आहेत. 

दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या चॉकलेट बॉक्‍सची किंमत ८०० रुपयांपर्यंत आहे. प्लेन चॉकलेट, ऍनिमल बटर फ्लाय, व्ही, लव्ह, ट्रेन्गल, स्टार आदी आकारांतील चॉकलेट विविध स्वादांमध्ये उपलब्ध आहेत. 
- रवी कानावत, विक्रेता. 

सांताच्या विविध वस्तू 
टोपी- २५ ते ७५ रु. 
क्रिप सेट- ५०० ते १५०० रु. 
बेल्स- ५ ते २० रु. 
वुलन- २० ते १०० रु. 
मास्क- ५० ते १०० रु. 
ट्री- १७५ ते १२०० रु. 
स्टार- ५५ ते २५० रु. 
ड्रेस- २५० ते १५०० रु. 
कॅंडल- २० ते ८० रु. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com