लग्नगाठ टिकवण्यासाठी ‘चला बोलूया’ उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 जानेवारी 2019

मुंबई - लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जात असले तरी, त्या टिकवण्यासाठी पती-पत्नीलाच प्रयत्न करावे लागतात; परंतु अनेकदा कुरबुरी वाढतात आणि घटस्फोटाचा निर्णय घेतला जातो. अशा प्रकारे संसार उद्‌ध्वस्त होऊ नयेत म्हणून उच्च न्यायालयाने ‘चला बोलूया’ हा समुपदेशनाचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. कोणी घटस्फोटाच्या विचारात असल्यास, एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करावा, हा उद्देश या उपक्रमामागे आहे.

उच्च न्यायालयातील महिला न्यायाधीशांच्या पुढाकारातून घटस्फोटपूर्व समुपदेशन ही संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. पती-पत्नीमध्ये वाद झाल्यावर त्यांनी थेट घटस्फोटासाठी दावा करण्याऐवजी ‘चला बोलूया’मार्फत एकमेकांशी नव्याने संवाद साधावा, अशी संकल्पना आहे. महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणामार्फत हा उपक्रम राबवण्यात येतो. त्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टीआयएसएस), श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठातील प्रशिक्षित समुपदेशक सेवाभावी वृत्तीने काम करतात. क्‍लिनिकल सायकोलॉजिस्ट पक्षकारांचे समुपदेशन करतात. घटस्फोट घेण्याची वेळच येऊ नये, यासाठी प्रयत्न करणे हा मुख्य हेतू आहे.

नि:शुल्क सेवा
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीमधील महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयात हा उपक्रम नि:शुल्क राबवला जातो. विशेष म्हणजे, ज्येष्ठ नागरिकही तक्रारींच्या निवारणासाठी येथे येऊ शकतात. याबाबतची माहिती राज्य सरकारच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

Web Title: Marriage Chala Boluya Event