हुंड्यामुळे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

कळवा : मुंब्रा येथील कौसा मधील मिनार रेसिडेन्सी येथील एका 25 वर्षीय महिलेने आपले पती, सासू व सासरे यांच्या जाचाला कंटाळून बुधवारी (ता. 18) आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी विवाहितेच्या पती, सासू व सासरे यांना अटक केली आहे.

मुंब्रा येथील अमृत नगर येथील नासीमा खातून चौधरी (ता. 25) हिचे कौसा मिनार रेसिडेन्सी येथे राहणाऱ्या शाबीर अली चौधरी (ता. 26) यांच्या बरोबर 12 फेब्रुवारी 2017 ला विवाह झाला होता. लग्नानंतर पती शाबीर व सासू अमिनुसा, सासरे जुबेर यांनी तिला माहेरहुन पैसे आणण्यासाठी सतत मानसिक, शारीरिक असा क्रुरपणे छळ चालविला होता. अखेर या छळाला कंटाळून नासीमा यांनी आपल्या कौसा येथील राहत्या घरी स्वयंपाक घरातील पंख्याला गळफास लावून बुधवारी आत्महत्या केली.

विवाहितेची बहिण शहाबुल्ला चौधरी हीने मुंब्रा पोलिसात हुंडाबळीची तक्रार दाखल केल्याने मुंब्रा पोलिसांनी विवाहितेचे पती,शाबीरअली चौधरी, (ता. 26), सासू अमिनुसा चौधरी (ता. 50) व सासरा जुबेर चौधरी यांना शुक्रवारी (ता. 20) अटक केली. या संदर्भात मुंब्रा पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

Web Title: married woman suicide for dowry violence