कुलाब्यात विवाहितेची हत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

मुंबई - कुलाबा परिसरातील एका 28 वर्षांच्या विवाहितेचा राहत्या घरात मृतदेह सापडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. आरोपीने मारहाण करून धारदार शस्त्राने तिचा गळा चिरला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. श्‍वेता महेंद्र तांडेल असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा पती कामानिमित्त बुधवारी सकाळी बाहेर गेला होता. 12.30 च्या दरम्यान तो घरी परतला त्या वेळी श्‍वेता रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे महेंद्रला दिसली. त्याने तत्काळ तिला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. श्‍वेताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार कुलाबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

श्‍वेता आणि महेंद्रचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. परिसरातील कोणाशीही त्यांचे वैर नव्हते. ओळखीतीलच व्यक्तीने ही हत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आहे.

Web Title: married women murder