esakal | सदोष गाड्यांसाठी ‘मारुती’चा रिव्हर्स गिअर
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

सदोष गाड्यांसाठी ‘मारुती’चा रिव्हर्स गिअर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: दोन वर्षांपूर्वीपासून बनवलेल्या एक लाख ८१ हजार ७५४ मोटारींमधील जनरेटर बदलण्यासाठी परत कारखान्यात बोलावण्याचा निर्णय मारुती सुझुकीतर्फे घेण्यात आला आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या सिआझ, आर्टिगा, व्हिटारा, ब्रीझा, एस-क्रॉस व एक्सएल ६ या प्रकारच्या त्या मोटारी आहेत.

या मोटारी चार मे २०१८ पासून ते २७ ऑक्टोबर २०२० पर्यंत बनविण्यात आल्या होत्या. आता त्यांच्यातील मोटर जनरेटरची तपासणी करून ते ग्राहकांना निःशुल्क बदलून दिले जातील. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून हे भाग बदलले जातील. त्यामुळे या प्रकारच्या मोटारचालकांनी (मालकांनी) या गाड्या, पाणी तुंबलेल्या रस्त्यांवरून नेऊ नयेत.

गाड्यांच्या इलेक्ट्रिकल-इलेक्ट्रॉनिक भागांवर थेट पाण्याचा फवारा मारू नये, असे मारुती तर्फे ग्राहकांना कळविण्यात आले आहे. या गाड्यांच्या मालकांना लौकरच मारुती सुझुकीच्या अधिकृत वर्कशॉपमधून याबाबत माहिती कळविण्यात येईल. किंवा या गाड्यांचे मालकही आपली गाडी परत पाठवायची आहे का, हे ऑनलाइन तपासू शकतील. आपल्या गाडीच्या चॅसी क्रमांकावरून मोटारमालक ही तपासणी करू शकतील. चॅसी क्रमांक हा गाडीच्या आयटी प्लेटवर एंबॉस केलेला असतो. तसेच गाडीच्या इनव्हॉईस-रजिस्ट्रेशन कागदपत्रांवरही तो नमूद केलेला असतो.

loading image
go to top