
उल्हासनगरमध्ये वडापावच्या दुकानात सिलिंडरचा भीषण स्फोट झालाय.
मुंबई : उल्हासनगरमध्ये वडापावच्या दुकानात सिलिंडरचा भीषण स्फोट झालाय. उल्हासनगरमधील कॅम्प नंबर चार परिसरातील व्हीनस चौकातील 'जय मातादी' नामक वडापावच्या दुकानात सिलिंडरचा भीषण स्फोट झालाय. प्राथमिक माहितीमुसार सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या रवाना झाल्यात आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहेत.
साधारण दोन वाजताच्या सुमारास या वडापावच्या दुकानात स्फोट झाला आणि यामध्ये स्वतः मालक, दुकानात काम करणारे कामगार आणि काही ग्राहक असे एकूण सात जण जखमी झाल्याचं समजतंय. या सर्वांना उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी भरती करण्यात आलं आहे. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचंही समजतंय. या आगीत होरपळलेल्या व्यक्तींच्या तब्येतीबाबत काही वेळात अधिक माहिती समोर येऊ शकते. दरम्यान सध्या अग्निशमनदलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे.
मोठी बातमी - विमान दुर्घटनेची बातमी आली आणि साठे कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली..
ULHASNAGAR - Section4 Gas Cylinder Blast hs occurred...Fire Brigade on spot#lockdownextension #Followme For more updates pic.twitter.com/OJIGgmarxy
— INDRADEV PANDEY (@Indradev_007) August 8, 2020
हेही वाचा : राम मंदिराच्या बांधकामासाठी मुंबई भाजपचे 'हे' एकटे नेते देणार एक कोटी रुपये
उल्हासनगरमधील कॅम्प नंबर ४ मधील व्हीनस चूक हा परिसर अत्यंत दाटिवाटीचा परिसर आहे. या परिसरात एकमेकांना खेटून दुकानं उभारण्यात आली आहेत. या भागात अनेक खाण्यापिण्याची आणि नाश्त्याची दुकानं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या आधीही या ठिकाणी अशा प्रकारच्या आगीच्या घटना घडल्या होता. सध्या अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयन्त सुरु आहेत.
massive cylinder blast in camp number 4 area of ulhasnagar 7 injured