वर्षाच्या पहिल्याच दिवशी आली दिलासादायक बातमी, सक्रिय कोविड रुग्णांमध्ये घट

वर्षाच्या पहिल्याच दिवशी आली दिलासादायक बातमी, सक्रिय कोविड रुग्णांमध्ये घट

मुंबई 01: मुंबई पालिकेने तयारी केलेली कडक नियमावली, मुंबईकरांमध्ये वाढलेली जनजागृती आणि रुग्णांना वेळेवर मिळालेले उपचार यामुळे मुंबईसह राज्यातील सक्रिय कोविड 19 च्या रुग्णांमध्ये गेल्या एका महिन्याच्या तुलनेत घट झाली आहे. एकीकडे रुग्णांची संख्या कमी होत असताना त्यातील सक्रिय रुग्णांची संख्या मुंबईत 33 आणि राज्यात 40 टक्के घटली आहे.

राज्याच्या कोविड 19 च्या आकडेवारीनुसार, 1 डिसेंबरपर्यंत 89,098 सक्रिय प्रकरणे आढळून आली होती. आता या सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होऊन 30 डिसेंबरपर्यंत 53,066 एवढे सक्रिय रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे, मुंबई शहरात 12,440 सक्रिय प्रकरणे आढळून आली आणि त्यात घट होऊन 8,292 एवढे सक्रिय रुग्ण आहेत.

पालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत लावण्यात आलेले कडक नियम आणि नागरिकांमध्ये असलेली जागरुकता शिवाय, संशयित रुग्णांनी वेळेत घेतलेले उपचार या सर्वामुळे संख्येत घट आणि सक्रिय रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. कोविड 19 सक्रिय रुग्ण हे सध्या रुग्णालयात आणि कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत शिवाय, होम क्वारंटाईन आहेत.

पालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकणी यांनी सांगितले की, मुंबईत कोरोना केसेवर नियंत्रण ठेवण्यात आम्हाला यश येत असले तरी ते कोविडच्या तयारीबाबत तडजोड करणार नाहीत आणि कोरोना पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत नागरिकांना कोविड -19 चे सर्व प्रोटोकॉल पाळावे लागतील. ऑक्सिजन पुरवठा, बेड्सची क्षमता, औषधे आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या कायम ठेवू. भविष्यात शहर कोणत्याही प्रकारच्या आपातकालीन परिस्थितीतसाठी तयार असणे गरजेचे आहे. शिवाय नोव्हेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात नोंदवलेल्या घटनांच्या तुलनेत रोजच्या केसेसही कमी झाल्या आहेत. ”

हिवाळ्यातील तापमानात घट झाल्यानंतर जानेवारीत राज्य अधिकारी अजूनही दुसऱ्या कोरोना लाटेची अपेक्षा करत असताना सक्रिय केसेसमध्ये घट नोंदवण्यात आली आहे. केसेस वाढण्याच्या बाबतीत अतिरिक्त सुविधा देण्यास तयार आहोत. सक्रिय प्रकरणांमध्ये सध्या कमी झालेल्या दरामुळे आरोग्य यंत्रणेवरील ओझे कमी करण्यास मदत झाली आहे, ”असे एका आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

मार्चपर्यंत राज्यातील परिस्थिती सुधारेल - 

राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, "संक्रमणाचा प्रसार कमी होत चालला आहे आणि म्हणूनच पॉझिटिव्ह रेट हळूहळू खाली येत आहे. तर, बऱ्याच लोकसंख्येत सध्या अँटीबॉडिज विकसित झाल्या आहेत. ज्यामुळे, संसर्गाचे प्रमाण कमी नोंदवले जात आहे. संख्या जरी कमी असली तरी प्रशासनाने सावधगिरी बाळगली आहे.

राज्यातील संसर्गजन्य रोग प्रतिबंधक नियंत्रण आणि टेक्निकल समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले की, "महाराष्ट्रात जर आतासारखीच परिस्थिती राहिली तर येत्या मार्चपर्यंत परिस्थिती बरयापैकी बर्यापैकी सुधारेल. मात्र, लोकांनी कोविडचे सर्व नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. दरम्यान, जानेवारीपर्यंत किमान सतर्क राहण्याचे आदेश आरोग्य विभागाकडून आधीच देण्यात आले आहेत. 

massive drop in active corona patients in mumbi and across maharashtra good news in new year

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com