Fire Video : मुंबईतल्या मित्तल इस्टेटमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी

mumbai andheri Fire Video
mumbai andheri Fire Videoesakal

मुंबईः मुंबईतल्या अंधेरी-कुर्ला रोडवरील मित्तल इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आगीची घटना घडली आहे. मागील दोन ते अडीच तासांपासून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

अंधेरीतल्या मित्तल इंटस्ट्रियल इस्टेटमध्ये अनेक गोदामं आहेत. याच गोदामांना दोन ते अडीच तासांपूर्वी आग लागली. आगीने क्षणार्धात रौद्र रुप धारण केलं. आग एवढी भीषण आहे की १० ते १२ गाड्या घटनास्थळी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

हेही वाचाः जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

या गोदामांमध्ये अनेक कामगार होते, अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुखरुप बाहेर काढलं आहे. आणखी काहीजण आतमध्ये अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यांचा शोध घेऊन त्यांना बाहेर काढण्याची मोहीम सुरु असून या घटनेमध्ये कसलीही जीवितहानी झालेली नाही. गोदामांमध्ये असलेला माल जळून खाक झाला आहे.

हेही वाचा: Year Ender 2022 : श्रद्धाचे 35 तुकडे ते भट्टीत बापाला जाळले... 'या' 7 घटनांनी देश हादरला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com