मुंबईत 'रोल्टा टेक्नॉलॉजी पार्क'मध्ये अग्नितांडव; ३० गाड्या घटनास्थळी...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

मुंबई - मुंबईच्या अंधेरी पूर्व भागातील MIDC परिसरात असलेल्या एका तीन मजली इमारतीला भीषण आग लागलीये. सध्या तब्बल ३० अग्निशमनदलाच्या गाड्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतायत. 'रोल्टा टेक्नॉलॉजी पार्क' असं या इमारतीचं नाव आहे. दुपारी साडे अकरा वाजताच्या सुमारास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सर्व्हर रूममध्ये आग लागली अशी माहिती समोर येतेय. सुरवातीला ही आग 'लेव्हल थ्री' ची होती. यानंतर ही आग वाढलेली पाहायला मिळाली. सुरवातीला ८ नंतर २० आणि आता तब्बल ३० गाड्यांच्या साहाय्याने या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न मिळवण्याचा प्रयत्न होतोय. 

मोठी बातमी - चेंजिंग रुममध्येच तिने बसवला 'तिसरा डोळा' आणि म्हणाली 'ड्रेस ट्राय करो'...

या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सर्व्हर रूममध्ये आग लागली होती. दरम्यान या इमारतीत व्हेंटिलेशन नसल्याने या इमारतीत घुसून आग विझवणे अग्निशमनदलाला शक्य नसल्याचं कळतंय. दुसऱ्या मजल्यावरून आग तिसऱ्या मजल्यावर देखील पसरलीय. आग लागलेली मुख्य जागा सर्व्हररुम होती. अशात सर्व्हर रूम थंड ठेवण्यासाठी बंदिस्त आणि AC चा वापर करण्यात येतो. या मधील AC कॉम्प्रेसरचा देखील स्फोट झाल्याचं बोललं जातंय. 

मोठी बातमी -  'हे' ११ नगरसेवक करणार राष्ट्रवादीत घरवापसी; गणेश नाईकांना मोठा धक्का.. 

सुदैवाची बाब म्हणजे या इमारतीत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. ही आग विझवण्यासाठी थर्मल इमेज कॅमेराजचा वापर करण्यात येत होता. मात्र व्हेंटिलेशन नसल्याने मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निर्माण झाल्याने या कॅमेऱ्यांचा फारसा उपयोग आग विझवण्यासाठी झालेला नाही 

दरम्यान या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर आसपासच्या भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आलाय. खबरदारीचा उपाय म्हणून आसपासच्या इमारती देखील रिकाम्या करण्यात आल्यात. 

Fire continues to rage at Rolta company in Andheri East

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: massive fire in Rolta technologies park company in Andheri East

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: