JVLR च्या अपघातामुळे 'मुंबई मेरी जाम'

JVLR च्या अपघातामुळे 'मुंबई मेरी जाम'

मुंबईतील जेव्हीएलआर मार्गावर कंटेनरचा अपघात झालाय.कंटेनर मेट्रोच्या बॅरिकेटिंगमध्ये घुसल्याने हा अपघात घडलाय. त्यामुळे मुंबईत जेव्हीएलआर मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना  मुंबईकरांना करावा लागतोय. एक कंटेनर मेट्रोच्या बॅरिकेटिंगमध्ये घुसल्याने हा अपघात झालाय. या अपघातामुळे मुंबईतील JVLR  वर दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा पाहायला मिळतायत. 

प्राथमिक माहितीच्या आधारे हा अपघात रात्री 2 वाजताच्या सुमारास झाला. अपघातामुळे संपूर्ण रस्त्यावर ऑईल पसरल्याने या कंटेनरला हटवण्यासाठी क्रेनला पाचारण करण्यात आलं. दरम्यान या अपघातात कोणीतीही जीवितहानी झालेली नाही. सकाळपर्यंत हा कंटेनर  हटवला न गेल्याने या अपघाताचा प्रचंड त्रास हा दररोज ऑफिससाठी ये जा करणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागलाय.

दरम्यान, पवई IIT ते सिप्झ फ्लायओव्हर आणि अंधेरी कुर्ला रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी झालीये. त्यामुळे तुम्ही जर या रस्त्याने जायचा विचार करत असाल तर प्लान चेंज करा. कारण तुम्हाला याठिकाणी किमान दीड तासाच्या ट्राफिकचा सामना करावा लागू शकतो.     

मुंबईत सध्या जागोजागी मेट्रोची कामं सुरु आहेत. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रात्रासाचा सामना करावा लागतोय. अशातच आज झालेल्या डंपरच्या अपघातामुळे मुंबईकरांची आजची सकाळ बंपर टू बंपर ट्राफिकची ठरलीये.    

तसा ट्राफिकजाम हा मुंबईकरांच्या पाचवीला पुजलेला. सकाळ असो किंवा संघ्याकाळ मुंबईकर रोजच या ट्राफिकजाम अनुभवत घेत असतात. अशातच  आज झालेल्या अपघातासारख्या घटना या मुंबईकरांचा दिवस खराब करण्यासाठी पुरेशा आहेत.   

Webtitle : Massive traffic congestion at JVLR, commuters stuck for hours

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com