खड्ड्यांमुळे मणक्‍याला ठणका!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

मुंबई  - सर्वच रस्ते खड्ड्यात गेल्याने बहुतांश रुग्णालयांत सांधे-पाठदुखीच्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. यात मणक्‍याचे विकार जडलेल्यांमध्ये तरुणांचे प्रमाण मोठे आहे.

साठी पार केलेले वयोवृद्धांनी खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास केल्यास त्यांना सांधेदुखी, स्पॉण्डिलिसीसचा त्रास होण्याची शक्‍यता असते. दुचाकीस्वार तरुणांच्या मणक्‍यांत कित्येकदा अंतर दिसून येते. कित्येकांना शस्त्रक्रियेशिवाय पर्याय राहत नाही, अशी माहिती अंधेरीतील कोकिळाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयाच्या स्पाईन सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. विशाल पेशत्तीवार यांनी दिली.

वाहतूक कोंडीत खड्ड्यांत अडकून पडल्याने कित्येकांना फ्रॅक्‍चर झाले आहे. रिक्षातून प्रवास करताना बहुतांश रुग्णांना त्रास होतो. खड्ड्यात पडल्याने तसेच रस्ते अपघातातही कित्येकदा गंभीर इजा होते.
- डॉ. कौशल मल्हन, फोर्टिस रुग्णालय, मुलुंड

Web Title: Maternal illness due to potholes