माथेरान घाटात कठडा तोडून टेंपो कोसळला रुळाजवळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

कर्जत - माथेरानहून नेरळच्या दिशेने घोडे वाहून नेणारा टेंपो वाहनचालकाचा ताबा सुटल्याने माथेरानच्या घाटात कठडा तोडून रस्त्यालगतच्या रेल्वे रुळाजवळ कोसळला. चालक, क्‍लीनर आणि घोडे आश्‍चर्यकारकरीत्या बचावले असले, तरी माथेरान घाटाच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

अलिबागला निघालेल्या या टेंपोचे मोठे नुकसान झाले आहे. माथेरान घाटाच्या दुरुस्तीसाठी एमएमआरडीएने 24 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून घाटरस्त्याचे मजबुतीकरण, संरक्षक भिंती उभारण्याचे काम झाले. मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. घाटात जुन्या भिंतीवर नवीन संरक्षक भिंती उभारताना स्ट्रक्‍चरल ऑडिट करणे आवश्‍यक होते. या संदर्भात माथेरानमधील नागरिकांनी एमएमआरडीएकडे तक्रारी केल्या होत्या.

Web Title: matheran ghat tempo accident