माथेरानची राणी आजपासून धावणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

माथेरान - ‘माथेरानची राणी’ अशी ओळख असणारी नेरळ-माथेरान-नेरळ मिनी ट्रेन शुक्रवार (ता. १९) पासून सुरू होणार आहे. अमन लॉज-माथेरान-अमन लॉज शटल सेवेच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. 

माथेरान - ‘माथेरानची राणी’ अशी ओळख असणारी नेरळ-माथेरान-नेरळ मिनी ट्रेन शुक्रवार (ता. १९) पासून सुरू होणार आहे. अमन लॉज-माथेरान-अमन लॉज शटल सेवेच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. 

१५ जून २०१८ रोजी मिनी ट्रेनची नेरळ-माथेरान-नेरळ सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर माथेरानची राणी १६ ऑक्‍टोबरला पुन्हा प्रवासी सेवेत रुजू होत असे. मात्र यंदा नेरळ-माथेरान-नेरळ प्रवासी सेवा तीन दिवस उशिराने सुरू होत आहे. १९ ऑक्‍टोबरपासून प्रवासी सेवा सुरू झाल्यानंतर नेरळहून माथेरानला जेमतेम ८ गाड्या सोडण्यात येणार आहेत. माथेरानहून नेरळसाठीही ८ गाड्या प्रवासी सेवेत असणार आहेत. माथेरान-अमन लॉजदरम्यान चालवल्या जाणाऱ्या शटल सेवेच्या फेऱ्यात वाढ केली आहे. सोमवारी शटल सेवेच्या १७ फेऱ्या होणार आहेत. मंगळवार ते गुरुवारदरम्या  १४ फेऱ्या होणार आहेत. मात्र शुक्रवारी शटल सेवेच्या २१ आणि शनिवार व रविवारी २२ फेऱ्या होणार आहेत.

Web Title: Matheran Mini Train

टॅग्स