माथेरान-नेरळ मिनीट्रेनचे इंजिन घसरल्याने प्रवाशांचा रात्रभर खोळंबा

neral
neral

नेरळ - माथेरानचा पर्यटन हंगाम लवकरच सुरू होत आहे. परंतु, मिनीट्रेनच्या इंजिनाचा सातत्याने होणाऱ्या बिघाडामुळे पर्यटकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. 20 एप्रिल रोजी माथेरान येथून 51 पर्यटक प्रवाशांना घेऊन निघालेली मिनीट्रेनचे बोगद्याजवळ इंजिन रुळावरून खाली घसरले. रुळावरून खाली उतरलेले इंजिन उचलायला तब्बल 16 तास लागल्याने मिनिट्रेन रात्रभर माथेरानच्या डोंगरात उभी होती.

दरम्यान, सायंकाळी पावणे चार वाजता रुळावरून इंजिन उतरलेली गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा नऊ वाजता तेथून हलली आणि 11.30 वाजता नेरळ रेल्वे स्थानकात पोहचली.

दरम्यान, नेरळ येथून माथेरानला जाणाऱ्या मिनिट्रेनची पहिली फेरी रद्द करण्यात आली.दुपारी पावणे चार वाजता ही गाडी एनएम 108 येथे आली असता इंजिन रुळावरून खाली उतरल्याने गाडी थांबली. त्यामुळे कुटुंबासह पर्यटनासाठी आल्याने प्रवाशांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी तीन किलोमीटर अंतर चालत घाटरस्त्यावर आणून टॅक्सी पकडून दिली. टॅक्सीने सर्व प्रवाशी नेरळ येथे रेल्वे स्थानकात पोहचले. दरम्यान, रुळावरून खाली उतरलेले इंजिन पुन्हा रुळावर ठेवण्यासाठी नेरळ लोको येथील कर्मचारी वर्ग पोहचला. परंतु, लोकोमधील तंत्रज्ञांना इंजिन रुळावर ठेवण्यात अडचणी येत होत्या. दुपारी पावणे चार वाजता रुळावरून खाली उतरलेले इंजिन रात्री उशिरा पर्यंत उचलता आले नाही. त्यामुळे गाडीवर असलेले कर्मचारी, टीसी, गार्ड हे सर्व कर्मचारी रात्रभर थांबून होते. सकाळी नऊ वाजून 20 मिनिटांनी एनएम 108 येथे अडकून पडलेली मिनीट्रेन पुन्हा पुढील प्रवास करण्यास तयार झाली आणि नेरळ करिता रवाना झाली. 

यानंतर, सकाळी माथेरान करिता सोडली जाणारी पहिली गाडी रद्द करण्यात आली. रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी नेरळ स्थानकात होती. त्यानंतर सकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी नेरळ येथून माथेरान करिता निघालेली पहिली गाडी पर्यटकांच्या गर्दीने हाऊसफुल झाली होती. मात्र माथेरान राणीच्या इतिहासात प्रथमच गाडी दुरुस्तीच्या कामासाठी थांबल्यानंतर 16 तास नॅरोगेजवर थांबण्याची ही पहिलीच वेळ आहे. एक संपूर्ण रात्र कर्मचारी त्या ठिकाणी थांबले होते. त्यानंतर 16 तासांनी तेथून निघाले. त्या काळात त्यांचा माथेरान स्थानक ते नेरळ स्थानक हा प्रवास 20 तासांहून अधिक वेळेचा होता. 

दरम्यान, पर्यटन हंगामासाठी सज्ज होत असलेल्या नेरळ -माथेरान-नेरळ ट्रेनचा पर्यटन हंगाम सुरू होत असताना हे रडगाणे अडचणी निर्माण करणारे आहे. अशी भावना पर्यटक व्यक्त करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com