शिक्षक पगाराविना; स्नेहसंमेलन दणक्‍यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

माथेरान - माथेरान नगरपालिका प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचे पाच महिन्यांचे पगार थकले असताना शाळांच्या स्नेहसंमेलनावर तब्बल एक लाखाचा निधी "कार्योत्तर' मंजूर करण्याची दिलदारी नगरपालिका सभागृहाने दाखवल्याने नागरिकांनी नवल व्यक्त केले आहे.

स्नेहसंमेलनाच्या ठेकेदाराला वाजवी दरापेक्षा जास्त दराने बिले अदा केली आहेत. माथेरान नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत दोन शिक्षक मानधनावर काम करीत होते. नगरपालिका त्यांना महिना आठ हजार रुपये पगार देत होती; परंतु त्यांचा पाच महिन्यांचा पगार दिला गेलेला नाही. नगरपालिकेकडे शिक्षकांच्या पगारासाठी पैसे नाहीत; पण डामडौलासाठी पैसे आहेत, असा संताप पालकवर्ग व्यक्त करीत आहेत.

Web Title: matheran news mumbai news teacher salary gathering