माथेरान राणीचा प्रवास गारेगार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

नेरळ - माथेरानची राणी अर्थात नेरळ-माथेरान मार्गावरील मिनी ट्रेनला वातानुकूलित डबा जोडण्यात आला आहे. या वातानुकूलित डब्यातून १५ प्रवाशांनी शनिवारी प्रवास केला. या मिनी ट्रेनसाठी पहिला प्रवासी ठरलेला पर्यटक विनायक घरत यांचा बुकिंग क्‍लार्क मंगेश दळवी आणि उदय मोडक यांनी सत्कार केला. २१ किलोमीटरच्या प्रवासासाठी पर्यटकांना एका तिकिटासाठी तब्बल ४१५ रुपये मोजावे लागणार आहेत. पहिल्या वातानुकूलित प्रवासासाठीची सर्व तिकिटे संपल्याने नेरळ-माथेरान-नेरळ मार्गावर वातानुकूलित प्रवास सुरू ठेवण्याबाबत रेल्वे प्रशासन निर्णय घेण्याची शक्‍यता आहे.

नेरळ - माथेरानची राणी अर्थात नेरळ-माथेरान मार्गावरील मिनी ट्रेनला वातानुकूलित डबा जोडण्यात आला आहे. या वातानुकूलित डब्यातून १५ प्रवाशांनी शनिवारी प्रवास केला. या मिनी ट्रेनसाठी पहिला प्रवासी ठरलेला पर्यटक विनायक घरत यांचा बुकिंग क्‍लार्क मंगेश दळवी आणि उदय मोडक यांनी सत्कार केला. २१ किलोमीटरच्या प्रवासासाठी पर्यटकांना एका तिकिटासाठी तब्बल ४१५ रुपये मोजावे लागणार आहेत. पहिल्या वातानुकूलित प्रवासासाठीची सर्व तिकिटे संपल्याने नेरळ-माथेरान-नेरळ मार्गावर वातानुकूलित प्रवास सुरू ठेवण्याबाबत रेल्वे प्रशासन निर्णय घेण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, पुन्हा वातानुकूलित प्रवासी डबा कधी लावला जाणार याबाबत कोणतीही माहिती नेरळ लोको विभाग किंवा तिकीट बुकिंग विभागाला देण्यात आलेली नाही. 

नेरळ मिनी ट्रेनला वातानुकूलित प्रवासी डब्बा लावण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता. त्यानुसार कुर्डुवाडी येथील मध्य रेल्वेच्या कार्यशाळेत वातानुकूलित डबा तयार करण्यात आले होते. गेल्या महिन्यात दोन प्रवासी वातानुकूलित डबे नेरळ येथे बनवून आणले आहेत. त्यातील एक वातानुकूलित प्रवासी डबा ८ डिसेंबरला नेरळ येथून माथेरानला जाणाऱ्या मिनी ट्रेनसाठी लावण्यात आला होता. सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी माथेरानसाठी रवाना झालेल्या मिनी ट्रेनमधील सर्व प्रवासी डब्बे प्रवाशांच्या प्रतिसादामुळे खचाखच भरले होते. वातानुकूलित डब्याच्या एका आसनासाठी ४१५ रुपये दर आकारले जाणार आहे.

मिनी ट्रेनमधून प्रवास करण्याची इच्छा होती. त्यामुळे द्वितीय श्रेणीची तिकीटे संपल्यानंतर फक्त एसी डब्याची तिकिटे शिल्लक होती. हे तिकीट ४१५ रुपये असतानाही कोणताही विचार न करता तिकीट खरेदी केले.
- विनायक घरत, पहिले भाग्यवान प्रवासी

नेरळ येथून माथेरानला जायला अडीच तास लागले. पण एसी डब्यातून प्रवास करत असल्याने वेळेचे काही वाटले नाही. त्याचवेळी घाट मार्ग असूनदेखील एसीच्या गारव्यात कोणताही फरक पडला नसल्याने आनंद वाटला.
- विजया पी, प्रवासी

Web Title: Matheran Rani Journey