माथेरानकरांचे आरोग्य वाऱ्यावर

अजय कदम
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

माथेरानमध्ये अडीच महिन्यांत धुवाधार पाऊस पडला. यानंतर गावात साथीच्या आजारांत वाढ झाली आहे. हे रुग्ण पालिकेचे बैरामजी जिजीभाई रुग्णालयात उपचारासाठी जातात; परंतु रुग्णालयातील डॉ. नीलेश यादव याची बदली झाली आहे; तर दुसऱ्या डॉक्‍टर वसुधा सिंग गैरहजर असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. गावात खासगी रुग्णालयही नसल्याने नेरळ, कर्जत आदी शहरातील रुग्णालयात धाव घ्यावी लागते. 

माथेरान : गेल्या आठवड्यात माथेरानमध्ये पावसाने दाणादाण उडवली होती. त्यामुळे आता या ठिकाणी आजारांनी डोके वर काढले आहे; परंतु येथील पालिकेच्या एकमेव रुग्णालयात डॉक्‍टरच नसल्याने रहिवाशांबरोबरच पर्यटकांचे आरोग्य वाऱ्यावर आहे. 

माथेरानमध्ये अडीच महिन्यांत धुवाधार पाऊस पडला. यानंतर गावात साथीच्या आजारांत वाढ झाली आहे. हे रुग्ण पालिकेचे बैरामजी जिजीभाई रुग्णालयात उपचारासाठी जातात; परंतु रुग्णालयातील डॉ. नीलेश यादव याची बदली झाली आहे; तर दुसऱ्या डॉक्‍टर वसुधा सिंग गैरहजर असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. गावात खासगी रुग्णालयही नसल्याने नेरळ, कर्जत आदी शहरातील रुग्णालयात धाव घ्यावी लागते. 
 
वडिलांना पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेलो होतो; परंतु डॉक्‍टर हजर नव्हते. या प्रश्‍नाकडे कुणीही पाहत नाही. रुग्णालयात प्रभारी डॉक्‍टरची नियुक्ती करणे आवश्‍यक आहे. 
- दिनेश सुतार, माजी नगरसेवक 

माथेरानमधील पालिकेच्या रुग्णालयात दोन डॉक्‍टर कार्यरत असतानाही डॉ. उदय तांबे यांची पालिकेतर्फे नियुक्ती करावी, यासाठी ठराव संमत केला होता; परंतु प्रशासनाच्या दिरंगाईमुळे त्यांना अजून कार्यादेश मिळाला नाही. त्यांना तो मिळावा, यासाठी प्रयत्न करत आहे. राज्य सरकारनेही डॉक्‍टर नियुक्त करावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 
- प्रेरणा सावंत, नगराध्यक्षा 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Matherankar's health on the wind