
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार , गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही आलेल्या धमक्या त्यानेच दिल्याचे चौकशीत कबुल केले आहे.
मुख्यमंत्री, शरद पवार आणि संजय राऊतांना धमकी देणाऱ्याला अटक; एटीएसची कारवाई
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मिर सोबत केल्यानंतर तिच्यावर टीका करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांना धमकी देणा-या माथेफिरूला कोलकात्यातून अटक करण्यात आली होती. याच आरोपीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार , गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही आलेल्या धमक्या त्यानेच दिल्याचे चौकशीत कबुल केले आहे. राज्याच्या दहशतवाद विरोधीत पथकाने(एटीएस) त्याला अटक केली होती. शिवसेना नेते संजय राऊत यांना तर एका माथेफिरूने सोशल मिडियावर खुल्ली जिवे मारण्याची धमकी दिली होती.
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेला BMC कडून सुरूवात; घरोघरी जात स्वयंसेवक तापमान तपासणार
महाराष्ट्रात सत्तास्थापनेपासून ते सुशांत सिंह राजपूत प्रकरणात वेळोवेळी शिवसेना नेते संजय राऊत भाजपला अंगावर घेत होते. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात कंगनाने उडी घेतल्यानंतर राऊतांनी तिला चांगलेच फटकारले. दोघांमध्ये चांगलाच शाब्दीक वाद झाला. कंगनाने मुंबई मला पाक व्याप्त काश्मिरसारखी वाटत असल्याचे विधान केल्यानंतर अनेकांनी तिच्यावर टीका केली. या वादा दरम्यान कंगनाच्या एका चाहत्याने समाज माध्यमाद्वारे शिवसेना नेते संजय राऊत यांना धमकी दिली. या घटनेची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने संबधित व्यक्तीचा माग काढला. त्यावेळी तो कोलकत्ता येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या एका पथकाने त्याला अटक केली आहे. त्याला कोलकत्तामधील न्यायालयात हजर करून ट्रान्झिस रिमांडद्वारे मुंबईत आणले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. आरोपी व्यायाम शाळेत प्रशिक्षक म्हणून दुबईत काम करतो. त्याच्याकडून
याच आरोपीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानीही यांनाही त्यानेच धमकीचे दूरध्वनी केल्याचे चौकशीत कबुल केले आहे.त्यासाठी त्याने दुबईतील मोबाईल क्रमांकाचा वापर केला. त्याच्याकडून दोन मोबाईल संच, भारतातील एक सीमकार्ड व दुबईतील तीन सीमकार्ड जप्त करण्यात आली आहे.
------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
Web Title: Matoshri Sharad Pawar And Sanjay Raut Arrested Threatening
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..