esakal | 'स्मारक की मातोश्री तीन??'; मनसे नेत्याचा शिवसेनेला खोचक सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

'स्मारक की मातोश्री तीन??'; मनसे नेत्याचा शिवसेनेला खोचक सवाल

मनसे नेते संदिप देशपांडे यांनी बाळासाहेबांच्या प्रलंबित स्मारकाबाबत शिवसेनेला खोचक सवाल केला आहे.

'स्मारक की मातोश्री तीन??'; मनसे नेत्याचा शिवसेनेला खोचक सवाल

sakal_logo
By
तुषार सोनवणे

मुंबई - शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज 8 वा स्मृती दिन आहे. त्यामुळे राज्यभरातील शिवसैनिक त्यांच्या स्मृतीस अभिवादन करीत आहेत. अशातच मनसे नेते संदिप देशपांडे यांनी बाळासाहेबांच्या प्रलंबित स्मारकाबाबत शिवसेनेला खोचक सवाल केला आहे.

हेही वाचा - आमच्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही; संजय राऊतांचा भाजपला टोला

आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी अनेक शिवसैनिक येत आहेत. स्मृतीस्थळाचे दर्शन घेत त्यांना अभिवादन करीत आहेत. बाळासाहेबांच्या स्मारकाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. महापौर बंगला शिवाजीपार्क येथिल नियोजित जागा स्मारकासाठी घेण्यात आली आहे. महापौर बंगला घेऊन तीन वर्षे झाली आहेत. अजूनही हा बंगला बंदच आहे. असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी एक ट्विटदेखील केले आहे.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना वाहिली आदरांजली

बाळासाहेबांचे स्मारक या बंगल्यात होणार असेल तर, ते बंदिस्त का आहे. बाळासाहेबांची जयंती आली किंवा स्मृतीदिन जवळ आला की, टेंडर काढण्यात आली. काम सुरू आहे. अशा बातम्या ऐकायला येतात. बाळासाहेंबांचे स्मारक सर्वांसाठी खुले असायला हवे. लोकांना त्या ठिकाणी का जाता येत नाही. कोणाची खासगी मालकी असल्यासारख का वापरलं जातंय? असे सवाल मनसे नेते संदिप देशपांडे यांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केले  आहेत. 

loading image
go to top