महापौर बंगल्याचे लवकरच हस्तांतरण 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 5 जानेवारी 2017

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौर बंगल्यातच उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने महापौर बंगल्याची जागा स्मारक समितीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची अधिसूचना लवकरच काढण्यात येणार आहे. 

महापौर बंगल्याची जमीन स्मारक समितीला 1 रुपया दराने 30 वर्षांच्या भाडेकराराने देण्यात येणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीची तारीख दोन-तीन दिवसांत जाहीर होण्याची शक्‍यता असल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेऊन शिवसेनेला दिलासा दिल्याचे मानले जाते. शिवसेनेने फडणवीस सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असताना स्मारक समितीला जमीन हस्तांतरित करण्याच्या निर्णयावर सरकारने शिक्‍कामोर्तब केले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत. सरकारने जमीन हस्तांतरणाचा निर्णय घेतला असला, तरी स्मारकाचे काम आचारसंहिता लागू होण्याआधी सुरू होणे अशक्‍य आहे, असे सांगण्यात येते. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर स्मारक समितीने मागणी केल्यावर महापौर बंगला समितीकडे हस्तांतरित करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे.

Web Title: Mayor bungalow soon transfer