...तर महापौर, उपमहापौर पदासाठी आग्रह - आठवले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

मुंबई - ""मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुती कायम राहिल्यास आम्हाला 25 ते 30 जागा मिळाल्या पाहिजेत. शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढल्यास आमची युती भाजपशी असेल. आम्ही त्यांच्याकडे 60 ते 70 जागांची मागणी करू. महायुतीची सत्ता आली, तर महापौर किंवा उपमहापौरपदासाठी आग्रह धरू,'' असे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज स्पष्ट केले. 

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आठवले यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ""महापालिकेच्या 1992 च्या निवडणुकीत आम्ही कॉंग्रेसशी युती केली. तेव्हा आम्ही कॉंग्रेसला पालिकेची सत्ता मिळवून दिली. गेल्या पालिका निवडणुकीत दलित मतदारांचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघात शिवसेना-भाजपच्या उमेदवारांना दलित मतदारांनी भरघोस मतदान केले; मात्र मित्रपक्षांची मते आमच्या उमेदवाराला मिळाली नाहीत.'' आमच्या पक्षाचे 1988 मध्ये 12 नगरसेवक निवडून आले होते, असेही त्यांनी सांगितले. 

यूपीत 250 जागा लढवणार 
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत युती करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी आपण चर्चा केली असून ते भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी लवकरच चर्चा करतील, असेही आठवले यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात 200 ते 250 जागा लढवण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Mayor, Deputy Mayor for instance the post - athawale