Diwali 2020 : ऑनलाईन २१ भाऊरायांना ओवाळत किशोरी पेडणेकरांनी साजरी केली भाऊबीज

सुमित बागुल
Monday, 16 November 2020

कोरोनामुळे यंदाची दिवाळी जरा वेगळी आहे. नेहमीप्रमाणे दिवाळी पहाटेची, नेहमीप्रमाणे फटाके नाहीत.

मुंबई : कोरोनामुळे यंदाची दिवाळी जरा वेगळी आहे. नेहमीप्रमाणे दिवाळी पहाटेची, नेहमीप्रमाणे फटाके नाहीत. अशात अनेकजण यंदा व्हर्च्युअल दिवाळी साजरी करण्यास प्राधान्य देतायत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीदेखील कोरोनाच्या संवेदनशील काळात व्हर्च्युअल दिवाळी साजरी केली आहे.

कोरोनामुळे सरकारकडून साध्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यास सांगितले आहे. त्यात, आज दिवाळीचा महत्त्वाचा दिवस म्हणजे भाऊबीज. अशात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपली भाऊबीज ऑनलाईन पद्धतीने साजरी केली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोनाच्या संवेदनशील काळात कायम साथ देणाऱ्या विविध क्षेत्रातील २१ भावांसोबत ऑनलाईन व्हिडीओकॉल करत भाऊबीज साजरी केली. 

महत्त्वाची बातमी कोरोनाच्या संकटातून निर्माण झाली संधी, समुद्र प्रदूषण टाळण्यातही खारीचा वाटा

भाऊबीज ही पारंपरिक सण सांभाळत  साजरी होत होती पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी राखत ऑनलाइन २१ भाऊरायांना ओवळत साजरी आजची भाऊबीज करण्याचा निर्णय घेतला आणि एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करीत भाऊबीज साजरी केली असं ट्विट किशोरी पेडणेकर केलंय.

यंदाचा दिवाळीचा सण कायम लक्षात राहणार असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्यात. कारण यंदा दिवाळी पाडवा आणि भाऊबीज एकत्र आलेले आहेत. आधी मिस्टर किशोर पेडणेकर यांना ओवाळल्यानंतर ऑनलाईन भाऊबीज साजरी केल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्यात. नवरा आणि भाऊ हे दोघेही स्त्रीचे रक्षणकर्ते आहेत असं देखील किशोरी पेणेकर माध्यमांशी बोलताना म्हणाल्यात. 

महत्त्वाची बातमी लवकरच मुंबईकरांच्या सेवेसाठी बेस्टच्या अत्याधुनिक डबल डेकर बसेस

कोरोना काळात मी माझा एक भाऊ गमावला, मात्र या काळात अनेकांनी स्वतःच जीव धोक्यात घालून मुंबईचे रक्षणकर्ते म्हणून उभे राहिलेत. यामध्ये अनेक डॉक्टर्स, परिचारिका, अनेकांनी आपली सेवा दिली. आज भाऊबीजेच्या निमित्ताने त्यांनी २१ प्रातिनिधिक डॉक्टरांना "देवदूत भाऊ" म्हणून औक्षण करण्याची संधी मिळाली याचा मला सार्थ अभिमान असल्याचं महापौर म्हणाल्या. यावेळी किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील सर्व नागरिक भाऊ बहिणींना घरी राहून दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलंय.

mayor of mumbai kishori pednekar celebrates virtual bhaidooj by video call


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mayor of mumbai kishori pednekar celebrates virtual bhaidooj by video call