चिमुकल्यांनी साकारली मायानगरी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

प्रभादेवी - जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महापालिका शिक्षण विभागातर्फे "माझी मुंबई' या विषयावर रविवारी (ता. 8) महापौर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. मुंबईतील सर्व उद्यानांत झालेल्या या बालचित्रकला स्पर्धेत चिमुकल्यांनी मायानगरी मुंबईचे हुबेहूब दर्शन घडवले. 

मुंबईतील महापालिका शाळांतील तसेच खासगी अनुदानित शाळा व विनाअनुदानित शाळांतील जवळपास 1700 हून अधिक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. इयत्ता 1ली ते 2 री, 3 री ते 5 वी, 6 वी ते 8 वी आणि 9 वी ते 10 वी अशा गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक गटात 20 प्रमाणे एकूण 25 प्रभागांतील 500 उत्तम चित्रांना अडीच लाखांची पारितोषिके देणार आहे. "माझी मुंबई', "चौपाटीवरील वाळूचा किल्ला', "आवडता खेळ', "माझी डिजिटल शाळा', "हरित मुंबई', "मासळी बाजार' व स्त्रीभ्रूणहत्या यावर सुंदर आणि विचार करायला लावणारी चित्रे विद्यार्थ्यांनी रेखाटली. 

चित्रकला स्पर्धेमुळे पालिका मैदाने आणि उद्याने विद्यार्थ्यांनी भरून गेली होती. शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानी महापौर स्नेहल आंबेकर यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या वेळी महापौर निवासस्थानी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापनाच्या विभागातील अधिकाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थितीत स्वत:चे आणि इतरांचे कसे रक्षण करावे, कोणत्या उपाययोजना कराव्यात यावर प्रात्यक्षिके दाखवली. यात नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. 

डोंगरीतही चित्रकला स्पर्धा 
मुंबादेवी (बातमीदार) ः शिक्षण विभागातर्फे बी वार्ड सीताराम सेनॉय उद्यानात चित्रकला स्पर्धा झाली. सहायक आयुक्त उदयकुमार शिरूरकर यांनी मुलांना "उत्तम चित्रे काढा आणि बक्षीस जिंका' असे सांगत शुभेच्छा दिल्या. बी वार्डचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास मोहोकर, डॉ. शारदा भगत यांना वैद्यकीय मदतीसाठी नियुक्त केले होते.

Web Title: Mayor painting competition