दारावेत ज्वेलर्सची भिंत फोडून ५० लाखांचे दागिने लांबवले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

नवी मुंबई - नेरूळ सेक्‍टर २३ दारावे येथील मयूरा ज्वेलर्सच्या दुकानाची भिंत फोडून ५० लाखांचे दागिने चोरांनी लंपास केल्याची घटना रविवारी उशिरा रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, ते तपास करत आहेत. दुकानाच्या शेजारी भाड्याने खोली घेऊन ही चोरी केली असल्याचे उघडकीस आले आहे.

मयूरा ज्वेलर्सच्या मालकाने रविवारी रात्री १० वाजता नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. त्यानंतर सोमवारी ते उघडले तेव्हा दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे आणि दुकानातील विक्रीसाठी ठेवलेले ४२ लाखांचे व ग्राहकांनी दुरुस्तीसाठी व गहाण ठेवलेले आठ लाखांचे असे एकूण ५० लाखांचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुकानाची पाठीमागची भिंत फोडून चोरांनी दुकानातील दागिने लांबवले. पोलिसांनी दुकानामागील चाळीत चौकशी केली असता, काही तरुणांनी दोनच दिवसांपूर्वी ज्वेलर्सच्या मागची खोली भाड्याने घेतली असल्याची माहिती मिळाली. ही खोली भाड्याने देताना खोलीमालकाने करार केला नसल्याचे उघडकीस आले.

Web Title: Mayura jewelry robbery