Crime News : मुंबईत लाखोंचे एमडी जप्त; ड्रग सिंडीकेटमधील 2 सदस्य आरोपी अटकेत

दोन्ही आरोपींना भायखळाच्या मदनपूरा भागात अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईत ताब्यात घेतले.
MD seized in Mumbai 2 members of drug syndicate accused arrested mumbai crime police
MD seized in Mumbai 2 members of drug syndicate accused arrested mumbai crime policesakal

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने 60 लाख रुपयांच्या किमतीचे 300 ग्रॅम मेफेड्रोन एमडी या अमली पदार्थासह दोन आरोपींना शनिवारी भायखळा येथून अटक केली आहे.

MD seized in Mumbai 2 members of drug syndicate accused arrested mumbai crime police
Mumbai Crime News : विम्याची रक्कम मिळवण्यासाठी मृत्यूचा बनाव; 3 आरोपी अटकेत

या दोन्ही आरोपींना भायखळाच्या मदनपूरा भागात अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईत ताब्यात घेतले. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. अटकेत असलेल्या एका आरोपीवर तो ड्रग्स सिंडीकेटचा सदस्य असल्याचा पोलिसाना संशय असून त्या दिशेने पोलीस तपास सुरू आहे.

MD seized in Mumbai 2 members of drug syndicate accused arrested mumbai crime police
Mumbai Crime: गीझरमुळे नाही तर भांग प्यायल्यामुळे जोडप्याचा मृत्यू! घाटकोपरच्या त्या घटनेला नवे वळण

अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांना अमली पदार्थाच्या तस्करी संदर्भात गुप्त माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे सापळा रचून दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. दोन्ही अटक आरोपी आंतरराज्यीय ड्रग सिंडिकेटचे सदस्य असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाने दिली आहे अटक आरोपी पैकी एका मुख्य आरोपीच्या नावावर 2017 साला पासून अमली पदार्थ तस्करीचे 3 गुन्हे दाखल आहेत. आरोपीला 2021 मध्ये दोन वर्षांसाठी शहरातून हद्दपार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com