भारतीय "मेधा' धावणार नव्या वर्षात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

मुंबई - भारतीय बनावटीची पहिली मेधा लोकल नव्या वर्षाच्या प्रारंभीच पश्‍चिम लोहमार्गावर धावणार आहे. तिच्या सर्व चाचण्या झाल्या आहेत. आता वेगाचे प्रमाणपत्र मिळाले आणि रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी हिरवा कंदील दाखवला, की ती प्रवाशांना घेऊन धावू लागेल, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

हैदराबाद येथील "मेधा सर्वो ड्राइव्ह' कंपनीने लोकलमधील इलेक्‍ट्रिकल सिस्टिम व मोटारची निर्मिती केल्याने लोकलला "मेधा' हे नाव पडले आहे. ती ऑक्‍टोबर 2015 मध्ये पश्‍चिम रेल्वेच्या ताफ्यात सामील झाली. पश्‍चिम रेल्वेचे अभियंते व रिसर्च डिझाइन स्टॅंडर्स ऑर्गनायझेशनच्या (आरडीएसओ) पथकाने वर्षभरात तिच्या "स्टॅटिक' (कारशेडमधील चाचण्या) व "डायनॉमिक' (लोहमार्गावरील चाचण्या) पूर्ण केल्या. चेन्नईतील आयसीएफ कारखान्यामध्ये ही लोकल बनविण्यात आली आहे. सहा हजार 30 प्रवाशांना वाहून नेण्याची तिची क्षमता आहे. चार हजार 862 प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतात.

सध्या पश्‍चिम रेल्वेच्या ताफ्यात 87 गाड्या आहेत. त्यांच्या चर्चगेट ते डहाणूदरम्यान दररोज एक हजार 323 फेऱ्या होतात.

Web Title: medha local