तळा शिवसेनेला खिंडार

मेढा सरपंचांचा राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
मेढा सरपंचांचा राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

तळा (बातमीदार) : तालुक्‍यातील मेढा ग्रामपंचायतीचे शिवसेनेचे सरपंच मधुकर वारंगे यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या वेळी खासदार सुनील तटकरे यांनी पक्षात त्यांचे जोरदार स्वागत केले. 

शिवसेनेकडून कामे होत नसल्याने अखेर कंटाळून मी व माझ्या ग्रामस्थांनी तटकरेंच्या विकास रथात बसून नागरिकांची सेवा करण्याची ठरवले आहे. ती आमची इच्छा आज पूर्ण झाली, असे मेढा सरपंच मधुकर वारंगे यांनी पक्षप्रवेश सोहळ्यात सांगितले.

केंद्रात सत्ता कुणाचीही असो, पण तिथून निधी आणण्याची ताकद बुद्धिमतेच्या जोरावर मी आपल्या आशीर्वादाने आणू शकतो. त्यामुळे या तालुक्‍यात काहीच कमी पडू दिले जाणार आहे. नागरिकांनी मला आजवर खूप प्रेम दिले. मी नागरिकांच्या विकासासाठी आपला खासदार म्हणून कटीबद्ध आहे. मेढा ग्रामपंचायत हद्दीतील सर्व विकासकामे करताना येथील पुलाच्या कामाला प्राधान्य दिले आहे. संबंधित यंत्रणेला तशा सूचनाही दिल्या आहेत. तो पूल लवकरच होईल. तालुक्‍यातील जी राहिलेली कामे असतील, त्याचा पाठपुरावाही केला जाईल. विकासाच्या बाबतीत तालुका अग्रेसर राहील, असे आश्वासन तटकरे यांनी दिले.

या वेळी तळा तालुकाध्यक्ष नथुराम अडखळे, माजी सभापती चंद्रकांत रोडे, माजी उपसभापती नाना भौड, जिल्हा पंचायत सदस्य बबन चाचले, तालुका युवक अध्यक्ष नागेश लोखंडे, मंगेश भगत, माजी सरपंच दत्तात्रय कांबळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माझ्या मागील कारकिर्दीत तालुक्‍यातील तहसील कार्यालय, क्रीडा संकुल, मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, वीज उपकेंद्र, रस्ते, पाणी, समाज मंदिरे, महिला कार्यशाळा, शैक्षणिक सुविधा पुरविण्यात यशस्वी झालो, याचा मनापासून आनंद होत आहे. यापुढेही भविष्यात बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी मी कसोसीने प्रयत्न करणार आहे. 
- खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com