खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे आज वांद्य्रात आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला सात दिवसांची स्थगिती देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात खुल्या वर्गातील विद्यार्थी आणि पालक शनिवारी (ता. 18) वांद्रे येथे आंदोलन करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांत मराठा आरक्षण लागू न करण्याचे आदेश देऊनही राज्य सरकार अधिसूचना काढणार असल्याने न्यायालयात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

मुंबई - पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला सात दिवसांची स्थगिती देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात खुल्या वर्गातील विद्यार्थी आणि पालक शनिवारी (ता. 18) वांद्रे येथे आंदोलन करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांत मराठा आरक्षण लागू न करण्याचे आदेश देऊनही राज्य सरकार अधिसूचना काढणार असल्याने न्यायालयात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातील मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. याची दखल घेत राज्य सरकारने प्रवेश प्रक्रिया सात दिवस स्थगित केली आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित करण्यासंदर्भात अध्यादेश काढला. सरकारने खुल्या वर्गासह इतर प्रवर्गांतील विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांचाही विचार करावा, या मागणीसाठी पाठपुरावा करणारे खुल्या वर्गातील विद्यार्थी आणि पालकांनीही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medical Admission Open Category Student Agitation in Bandra